शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम महागले; व्यावसायिक अडचणीत

By admin | Updated: May 7, 2017 01:07 IST

सिमेंट, वाळू दरवाढीचा परिणाम; प्रतिस्क्वेअर फूट दर दोनशेनी वाढला; सिमेंट दरवाढ रोखण्याची सरकारकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घरबांधणीचा कणा असलेली वाळू आणि सिमेंटच्या दरवाढीमुळे बांधकाम महागले आहे. या दरवाढीतून विविध गृहप्रकल्पांचे काम करताना बांधकाम व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे शिवाय बांधकामाचा दर प्रतिस्क्वेअर फुटाला सरासरी दोनशे रुपयांनी वाढला आहे.बांधकामात स्टीलबरोबरच वाळू आणि सिमेंट हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सध्या वाळू उपसा बंद आहे. उपसा बंद असल्यामुळे मागणीच्या तुलनेत वाळूची उपलब्धता कमी असल्याने साधारणत: एक ट्रक वाळूच्या दरात सरासरी चार ते सहा हजार रुपयांची वाढ झाली. अडीच ब्रास वाळूच्या एक ट्रकसाठी आता २६ ते २८ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सिमेंट कंपन्यांनी ५० किलो सिमेंटच्या पोत्यामागे सरासरी ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे २४२ रुपयांना मिळणाऱ्या एका पोत्याचा दर ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचा परिणाम रेडिमेड काँक्रिटच्या दरवाढीवरदेखील झाला आहे. कोल्हापुरात सध्या विविध ठिकाणच्या ७५ प्रकल्पांमध्ये दीड ते दोन हजार फ्लॅटचे बांधकाम सुरू आहे. वाळू, सिमेंट महागले असल्याने बांधकामाच्या दरात सरासरी दोनशे रुपये स्क्वेअर फूट इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांतील काम पूर्ण करताना कसरत करावी लागत आहे. ही दरवाढ परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना ‘खो’ घालणारी आहे. वाळू आणि सिमेंटची दरवाढ कमी करण्याबाबत सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे असल्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे. वाळू आणि सिमेंटची दरवाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांचे काम पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली आहे. वाळूसाठी दुसरा पर्याय आम्हाला उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच देणार आहोत. सिमेंटचे दर कमी करण्याबाबत ‘क्रिडाई’ चे केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.- महेश यादव, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर.वाळू, सिमेंटच्या दरांमध्ये झालेली वाढ बांधकाम व्यवसायाला मारक ठरणारी आहे. ही दरवाढ कमी करण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा. वाळू, सिमेंटच्या दरांवर सरकारने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.-संजय शिंदे, बांधकाम व्यावसायिकवाळूचा वापर कमी करण्याचा पर्यायवाळूची दरवाढ आणि तिचा कमी असलेला पुरवठा अशा स्थितीत बांधकामासाठी वाळूचा वापर कमी करण्याचा पर्याय बांधकाम व्यावसायिकांनी स्वीकारला आहे. अनेक व्यावसायिकांनी वाळूचा वापर २५ टक्क्यांपर्यंत आणला आहे. ‘एएसी ब्लॉक’ हे केमिकलद्वारे जोडून त्यावर बाहेरून जिप्सम लावून बांधकाम केले जात आहे. सिमेंटसाठी असा दुसरा सशक्त पर्याय उपलब्ध नाही. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे. त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या वाळूच्या दरात चार ते सहा हजार रुपये प्रति ट्रक अशी वाढ झाली आहे. उपसा बंद असल्याने वाळू वाहतुकीवर अवलंबून असणारे ५०० ट्रकचालक, सुमारे ६०० हमाल व अन्य कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रोजगाराचा प्रश्न आणि बांधकाम क्षेत्राची गरज लक्षात घेऊन वाळू उपशासाठी पूर्वीप्रमाणे परवानगी द्यावी.- सुभाष जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन.सुमारे ६५ हजार टन सिमेंट१ जिल्ह्यात १३ हून अधिक कंपन्यांचे सिमेंट उपलब्ध आहे. ४३ ग्रेड, ५३ ग्रेड, पी.पी.सी. व पी.एस.सी. आदी चार ग्रेडचे सिमेंट येते. २ काँक्रीट, बांधकाम व गिलावा आदींसाठी सिमेंटचा वापर होतो. महिन्याला सुमारे ६५ हजार मेट्रीक टन इतके सिमेंट कोल्हापूर जिल्ह्याला लागते. ३ कच्चा माल, वाहतूक आदींच्या दरात वाढ झाल्याने सिमेंटची किंमत वाढविण्यात आली असल्याचे एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.