शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरेंच्या हत्येमागे सनातनी

By admin | Updated: November 14, 2015 00:07 IST

भारत पाटणकर : आता कार्यकर्तेच करणार ‘कोम्बिंग आॅपरेशन’

आळसंद : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी शासन यंत्रणेकडून पोलिसांवर दबाव आणला जात आहे. या मारेकऱ्यांना शोधून काढण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची नावनोंदणी केली जाणार आहे. कार्यकर्त्यांच्यावतीने कोम्बिंग आॅपरेशन केले जाणार आहे. गुंड छोटा राजन सापडतो, मग दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत? असा संतप्त सवाल करून, डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंदराव पानसरे यांची हत्या सनातनी प्रवृत्तीनेच केली असल्याचा आरोप धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी गुरुवारी केला. बलवडी-तांदळगाव (ता. खानापूर) येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. पाटणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई पाटणकर होत्या. डॉ. पाटणकर म्हणाले की, दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढावे, या मागणीसाठी २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पुणे-कोल्हापूर अशी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून त्या सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. पाटणकर यांनी केले. ते म्हणाले की, खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीचे जलयुक्त शिवार अभियानातून पुनरुज्जीवन होत आहे. त्याच पध्दतीने येरळा नदीचे होणार आहे. त्याची सुरुवात बळिराजा धरणापासून होणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मान्यताही दिली आहे. शासनाच्या माध्यमातून येरळा नदीतील गाळ, जलपर्णी काढली जाणार आहे.यावेळी बळिराजाचा खून करणाऱ्या वामनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. इंदुताई पाटणकर, संपत देसाई, गेल आॅम्वेट, अ‍ॅड. कृष्णा पाटील, जयंत निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मोहनराव यादव, विलास चव्हाण, पांडुरंग चव्हाण, विक्रम चव्हाण, संदीप दुपटे, अनिल दुपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मच्छिंद्र पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर रघुनाथ पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. (वार्ताहर)