रामानंदनगर (ता. पलूस) येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 'चला विचार तरी करूयात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. प्राचार्य एल. डी. कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पक्षिमित्र संदीप नाझरे, प्रा. काकासाहेब भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संदीप नाझरे यांनी पक्षी आणि अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले, तर चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलनवर प्रात्यक्षिके सादर केली. चव्हाण म्हणाले. अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाची कास धरावी लागेल.
आपली जन्मदात्री आई आणि वडील हेच आपले दैवत आहेत, तर सावित्रीबाई फुले याच शिक्षणाच्या खऱ्या देवता आहेत.
स्वतःला चांगल्या विचारांचा लगाम घाला, तरच तुम्ही चांगली व्यक्ती बनाल. स्वतःवर इतका विश्वास ठेवा की, देवालाही वाटले पाहिजे की तुम्ही यशाचे खरे हक्कदार आहात. कर्मकांडात न अडकता विवेकाने वागा. विचारांना विवेकाची, विज्ञानाची जोड दिल्यास अंधश्रद्धा निर्मूलन सहज शक्य आहे.