शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आबांच्या जतमधील दौऱ्याने काँग्रेस अस्वस्थ

By admin | Updated: July 13, 2014 01:08 IST

जागावाटपाचा तिढा : राष्ट्रवादीची विधानसभेसाठी ‘फिल्डिंग’

जयवंत आदाटे / जतआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी मागील महिन्यात चारवेळा जत तालुक्याचा दौरा करून जत विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे सांगून, उमेदवारी कोणाला द्यायची ते नंतर बघू, सर्वजण कामाला लागा, अशी सूचना केली आहे. त्यांचा आदेश मानून कार्यकर्ते कामाला लागल्यामुळे कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.गुड्डापूर, कुडनूर आणि जत येथील लग्नसमारंभ व शेगाव येथील शहीद जवानावरील अंत्यसंस्कार कार्यक्रम यानिमित्ताने गृहमंत्री पाटील यांनी एका महिन्यात चारवेळा जत तालुक्याचा दौरा केला आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप यांच्या विरोधकांना एकत्र करून त्यांना राजकीय पाठबळ देण्याचा प्रयत्नही या दौऱ्याच्या निमित्ताने पाटील यांनी सुरू ठेवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकपूर्व वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.सांगली जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांतील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जागावाटप निश्चित मानले जात असले, तरी जत व शिराळ्याचे जागावाटप अनिश्चित आहे. मागीलवेळी जतची जागा राष्ट्रवादीकडे होती. आता ती कॉँग्रेससाठी जाहीर झाली, तर शिराळ्याची जागा राष्ट्रवादीकडे जाईल किंवा जतची जागा राष्ट्रवादीला मिळाली, तर शिराळा कॉँग्रेसकडे जाईल, असे सांगितले जाते. शिराळ्यात राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी मिळणार की, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या पारड्यात श्रेष्ठींचे वजन पडणार, यावर जतची गणिते आधारलेली आहेत. मग गृहमंत्री पाटील जत येथील जागावाटप निश्चित नसताना कामाला लागा म्हणून कसे काय सांगत आहेत, असा सवालही विचारला जात आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीकडून पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रभाकर जाधव, चन्नाप्पा होर्तीकर यांची नावे चर्चेत आहेत, तथापि प्रभाकर जाधव यांनी तयारीही सुरू केली आहे.कॉँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जादा आहे. त्यामुळे जत तालुक्यातील कॉँग्रेस पक्ष एकसंध राहिलेला नाही. गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून सर्वच इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आकाडीच्या निमित्ताने गावपातळीवरील बैठकांना गती आली आहे. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नातेवाईक व भारती बँकेचे संचालक विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे यांची नावे चर्चेत आहेत. विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांनी महायुतीकडून भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून, आपण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ, असा दावा केला आहे; परंतु हा दावा वास्तवात आणण्यात अनेक अडसर आहेत. मागील निवडणुकीत तालुक्यातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना निवडून आणले होते. त्यांना ज्यांनी निवडून आणले होते, तेच सर्वजण यंदा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. याशिवाय शेंडगे यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसची तीच मंडळी नाराज असल्याचे जाहीरपणे सांगितले जाते. त्यामुळे शेंडगे यांची दमछाक सुरू झाली आहे.