शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जत पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी : उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार , नीलेश बामणेंची स्वीकृत सदस्यपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:17 IST

जत : जत नगरपालिकेत अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, उपनगराध्यक्षपदी आप्पासाहेब दुर्गाप्पा पवार यांची बिनविरोध निवड केली.

जत : जत नगरपालिकेत अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, उपनगराध्यक्षपदी आप्पासाहेब दुर्गाप्पा पवार यांची बिनविरोध निवड केली. ते राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे समर्थक आहेत. स्वीकृत सदस्य म्हणून नीलेश तानाजी बामणे यांची निवड झाली आहे. ते काँग्रेसचे नेते विक्रम सावंत समर्थक आहेत. दोन गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली.

उपनगराध्यक्ष पदासाठी आप्पासाहेब पवार यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत आहे, असे नगराध्यक्षा बन्नेनवार यांनी जाहीर केले. स्वीकृत सदस्य पदासाठी इराण्णा निडोणी व नीलेश बामणे यांच्यात काँग्रेसअंतर्गत शेवटपर्यंत चुरस होती. शेवटच्या घटकेला बामणे यांचे नाव निश्चित झाले. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जादा होती. त्यामुळे प्रत्येकाला एक वर्ष संधी मिळणार आहे असे समजते.

भाजपने गटनेत्याची निवड केली नाही. त्यामुळे त्यांच्या स्वीकृत सदस्यांची निवड येत्या आठ तारखेला होणार आहे. काँग्रेसने गटनेतेपदी इकबाल गवंडी यांची, तर राष्ट्रवादीने स्वप्निल शिंदे यांची निवड केली आहे.

निवड जाहीर झाल्यानंतर मुख्याधिकारी हेमंत निकम, सुरेश शिंदे, रमेश पाटील, विक्रम सावंत, बाबासाहेब कोडग, सिध्दू क्षीरसाड, उत्तम चव्हाण, सुजय शिंदे, राजू मुल्ला, बाजी केंगार, गणेश गिड्डे आदी मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.आप्पासाहेब पवार हे प्रभाग एकमधून निवडून आले आहेत. निवड जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष, गट-तट व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.विशेष सभेत निवडजत नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली आहे. नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवड करण्यासाठी गुरुवारी नगरपालिकेची विशेष सभा आयोजित केली होती. या विशेष सभेसाठी भाजप ७, काँग्रेस ७ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ असे एकूण २० नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपनराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड झाली.जतच्या उपनगराध्यक्षपदी आप्पासाहेब पवार आणि स्वीकृत सदस्य म्हणून नीलेश बामणे यांची निवड झाली. त्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली.