शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तरीही मिरजेत बंडखोरी

By admin | Updated: April 28, 2017 00:58 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तरीही मिरजेत बंडखोरी

सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींच्या निवडीसाठी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. प्रभाग एक व दोनमध्ये दोन्ही पक्षांनी समित्या वाटून घेतल्या, तर प्रभाग तीनचा फैसला शनिवारी निवडीवेळी होणार आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये मात्र काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. या प्रभागातून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची अधिकृत उमेदवारी धोक्यात आली आहे. शनिवारी या चारही प्रभाग सभापतींच्या निवडी होणार आहेत. चार प्रभाग समिती सभापतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची मुदत होती. सकाळपासूनच इच्छुक नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या मारला होता. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक होऊन, उमेदवारांची नावे निश्चित केली जात होती. दुपारी दोन वाजता काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी गटनेते किशोर जामदार यांनी चर्चा करून काही नावांवर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी काँग्रेसला प्रभाग १, २ व ४ अशा तीन समित्या, तर राष्ट्रवादीला प्रभाग समिती दोन देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार प्रभाग एकसाठी काँग्रेसकडून पांडुरंग भिसे व वंदना कदम यांनी अर्ज दाखल केले. या प्रभागात राष्ट्रवादीने अर्ज दाखल केला नाही. प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीकडून अंजना कुंडले, तर स्वाभिमानीकडून अश्विनी खंडागळे यांनी अर्ज दाखल केले. कुंडले यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. त्यामुळे खंडागळे यांची सभापती पदाची वाट बिकट झाली आहे. प्रभाग तीनमध्ये अंतिम निर्णय न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून गुलजार पेंढारी, तर राष्ट्रवादीकडून स्नेहा औंधकर यांचे अर्ज दाखल झाले. मिरजेतील प्रभाग चारच्या सभापती पदावरून नाट्यमय घडामोडी घडल्या. या प्रभागावर गेली १८ वर्षे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व आहे. नायकवडी यांना विश्वासात न घेताच काँग्रेसकडून अश्विनी कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे शिवाजी दुर्वे हेही इच्छुक होते. त्यांनी स्वतंत्ररित्या अर्ज दाखल करीत बंडखोरी केली, तर राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली असतानाही शुभांगी देवमाने यांनी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. दुर्वे व देवमाने यांच्यापैकी एक रिंंगणात राहणार, हे निश्चित आहे. त्याचा फैसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी शेवटच्याक्षणी करतील. त्यामुळे अश्विनी कांबळे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. येत्या शनिवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती सदस्यांच्या बैठकीत सभापती पदाची निवड होणार आहे. सांगली व कुपवाडमधील प्रभाग समित्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी, मिरजेच्या प्रभाग समितीवर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसलाही शनिवारी होईल. (प्रतिनिधी)इद्रिस नायकवडींची चालमिरजेतील प्रभाग समिती चारवर महापालिकेच्या स्थापनेपासून माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व आहे. नायकवडींचा पाठिंबा असलेला उमेदवारच आजअखेर सभापती झाला आहे. आताही हा प्रभाग काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. या प्रभागात २१ सदस्य आहेत. त्यापैकी अकरा ते बारा सदस्य नायकवडींना मानणारे आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी, समितीवर नायकवडी गटाचेच प्राबल्य राहणार आहे. या निवडीतून वर्षभरानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मिरजेचे चित्रही जवळपास स्पष्ट होईल. काँग्रेसकडे गटनेता किशोर जामदार वगळता सर्वपक्षीय नगरसेवक नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र येतील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.