शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:49 IST

अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारके लोकमत न्यूज नेटवर्क विटा : टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी मीच १३०१ कोटी रुपयांचा ...

अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारकेलोकमत न्यूज नेटवर्कविटा : टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी मीच १३०१ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात सिंचन योजनांची कामे ठप्प होती. त्यामुळे या अपूर्ण जलसिंचन योजना म्हणजे त्यावेळच्या कॉँग्रेस व राष्टÑवादीची स्मारके बनली होती. परंतु भाजप सरकारने प्रयत्न करून योजना मार्गी लावल्या, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.सांगली लोकसभा मतदासंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित विजय संकल्प सभेत गडकरी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंदक्रांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. अनिल बाबर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, अशोकराव गायकवाड उपस्थित होते.गेल्या ७२ वर्षांपैकी ६० वर्षे कॉँग्रेसने सत्ता भोगली. परंतु, जनता आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांनी केवळ जातीयतेचे विष पेरले. सत्ता व मतांसाठी दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकणारा नव्हे, तर दहशतवाद मुळापासून नष्ट करून देश आणि शेतकरी समृध्द बनविणारा, नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रधानमंत्री देशाला द्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.गडकरी म्हणाले की, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याची योजना आणली आहे. ऊस दरासाठी आंदोलन करणाºया खा. राजू शेट्टी यांना याबाबत समजावून सांगितले. परंतु, ते ऊस व अतिरिक्त साखरेचा प्रश्न समजून न घेताच, एकतर्फी आंदोलन करतात.खा. पाटील, अशोकराव गायकवाड, संजय विभुते यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती मनीषा बागल, मकरंद देशपांडे, अनिल म. बाबर, शंकर मोहिते, अमोल बाबर, राजाराम गरूड उपस्थित होते.दादांच्या नातवाकडून स्वाभिमान गहाणभाजप सरकारचे लाभार्थी आम्हाला कधीही विसरणार नाहीत. न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण, आर्थिक मागास आरक्षण असे ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतले. वसंतदादांचा वारसा सांगणाºया त्यांच्या नातवाने स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण ठेवला, अशी टीका विशाल पाटील यांच्यावर, तर मुख्यमंत्र्यांनी जिवापाड प्रेम करूनही वेगळा पवित्रा घेतल्याची टीका गोपीचंद पडळकर यांच्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक