शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आबांच्या खेळीने काँग्रेसला लॉटरी

By admin | Updated: July 16, 2014 23:38 IST

तासगाव नगरपालिका : संजयकाकांच्या गटाला धक्का

अमित काळे - तासगावतापलेल्या तासगावच्या आखाड्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली. यात काँग्रेसचे उमेदवार संजय पवार यांना नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली, तर आवश्यक संख्याबळ होईल, असा विश्वास असणाऱ्या खा. संजयकाका पाटील गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.आठवडाभरापासून तासगावचे राजकारण नगरपरिषदेच्या सत्ताकारणावरून सुरू होते. तुल्यबळ असणारे आबा—काका गट आमने—सामने असल्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीवरून तयार झालेला ‘सस्पेन्स’ तासगावकरांना अनुभवायला मिळाला. १९ सदस्यसंख्या असलेल्या पालिकेत १0 मतांसह काँग्रेसच्या संजय पवार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष पदावर दावा करण्यात आला. पालिकेत आबा गटापेक्षा काका गटाचे संख्याबळ कमी असून देखील काका गटाचा विश्वास ठाम होता. त्यांनी आबा गटाचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न केले होते. मूळ बलाबल पाहिले, तर आबा गटाकडे १0, काका गटाकडे ८ व काँग्रेसचा १, असे १९ सदस्य निवडून आले होते.गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसचे नगरसेवक संजय पवार यांचा अर्ज भरायला लावून शेवटी त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गटाच्या शुभांगी साळुंखे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. गृहमंत्री पाटील गटाच्या नगरसेविका जयश्री धाबुगडे यांनी काका गटाच्या बाबासाहेब पाटील यांना मतदान केले. आणखी एखादा नगरसेवक फुटला असता, तर काका गटाचा नगराध्यक्ष झाला असता. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. परंतु आबा गटाची रणनीती यशस्वी झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासूनच दोन्ही गटाचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ होते. आज सकाळपासून हालचाली पुन्हा गतिमान झाल्या होत्या.या निवडणुकीत व्हीपही काढण्यात आला. आबा गटाच्या अमोल शिंदे यांनी सोमवारी, तर काका गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी व्हीप काढला. हे दोन्ही व्हीप पालिकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले होते. दोन्ही गटाकडून व्हीप निघाल्याने चांगलाच संभ्रम तयार झाला. पालिकेच्या निवडणुकीवेळी आबा-काकांचे सख्य होते. दोन नेत्यांमधील बिघाडीनंतरच ही निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचे कारण आगामी विधानसभा निवडणुकीतही आहे. एकूणच रंगलेल्या या राजकारणात गृहमंत्र्यांनी शह-काटशहच्या राजकारणातून काँग्रेसच्या नगरसेवकाला नगराध्यक्ष केले व खा. संजयकाका पाटील गटाला सत्तेपासून दूर ठेवले.आज नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत पूर्वाश्रमीच्या मंत्री पाटील गटाच्या नगरसेविका जयश्री धाबुगडे यांनी खासदार संजय पाटील गटाच्या बाबासाहेब पाटील यांना मतदान केले. आणखी एखादा नगरसेवक फुटला असता, तर खासदार गटाचा नगराध्यक्ष झाला असता. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. मात्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसचे नगरसेवक संजय पवार यांचा अर्ज भरायला लावून शेवटी त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गटाच्या शुभांगी साळुंखे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. परंतु आबा गटाची रणनीती यशस्वी झाली.