शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कॉँगे्रसचे घर तरी दुरुस्त करायलाच हवे

By admin | Updated: December 3, 2015 00:49 IST

पतंगराव कदम : जिल्ह्यात पक्षाला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करणार

सांगली : राज्य पातळीवर राष्ट्रवादी या मित्रपक्षासोबत काम करण्याचा विचार आता सुरू झाला आहे. त्या निर्णयावर जिल्ह्यातील वाटचालही अवलंबून आहे. आघाडी झाली तर ठीक, नाही तर कॉँग्रेसचे घर तरी दुरुस्त करावेच लागेल, असे मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, हा जिल्हा वसंतदादा व राजारामबापूंचा आहे. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या काळात हा जिल्हा एकसंध ठेवला होता. पुन्हा तशीच ताकद या जिल्ह्यात निर्माण करायची आहे. वरिष्ठ पातळीवर आता विरोधक म्हणून काम करताना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णय झालाच तर, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातही केली जाईल. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चासुद्धा झाली आहे. स्वतंत्रपणे काम करायचा निर्णय झाला तर, जिल्ह्यात कॉँग्रेसचे संघटन पुन्हा पूर्वीसारखे करण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुकांपूर्वी पक्षाचे जिल्ह्यातील घर तरी दुरुस्त करावेच लागेल. जिल्ह्यात आगामी काळात तासगाव, आष्टा, इस्लामपूर आणि विटा या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मित्रपक्षासोबत जाण्याचा निर्णय झाला तर, तशापद्धतीने निवडणुका लढविल्या जातील, अन्यथा स्वतंत्रपणे आम्ही या निवडणुका लढू. जिल्ह्यापासून राष्ट्रापर्यंत सर्वत्र पक्षाचे एकच सूत्र असले पाहिजे. मित्रपक्षासोबत काम केल्यास जोमाने संघटन वाढविता येईल. हिवाळी अधिवेशनानंतर महापालिकेतील कॉँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली जाईल. त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. दुष्काळी प्रश्नाबाबत ते म्हणाले की, राज्यातून दुष्काळप्रश्नी एकही आदेश अद्याप जिल्हापातळीवर आला नाही. शासनाकडे कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन नाही. सर्वप्रकारचे बजेट बाजूला करून दुष्काळग्रस्तांना मदत करणे आवश्यक आहे. सांडगेवाडी, पलूस येथील औद्योगिक वसाहतीत फळप्रक्रिया आणि उत्पादनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)