शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यात काँग्रेसला भाजपचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मिरज पूर्व भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविणाºया भाजप विरूध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरूध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडी अशी लढत होणार आहे. मतदार सरपंचांची थेट निवड करणार असल्याने अनेक ...

ठळक मुद्दे राजकीय मोर्चेबांधणी सुरू : ३८ ग्रामपंचायतींसाठी आॅक्टोबरमध्ये निवडणूकसरपंच पदासाठी चाचपणी सुरू झाली आहे. भाजपचा सामना करण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मिरज पूर्व भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविणाºया भाजप विरूध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरूध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडी अशी लढत होणार आहे. मतदार सरपंचांची थेट निवड करणार असल्याने अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली आहे. मिरज पूर्व भागातील बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी, करोली-एम, मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कनडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी यापूर्वीच विविध राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते. मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने, पूर्व भागातील काही ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. यावेळी ग्रामपंचायतीसाठी भाजप विरूध्द काँग्रेस अशी लढत होणार आहे. काही गावात अस्तित्व असलेली अजितराव घोरपडे यांची विकास आघाडी कोणाला साथ देणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.मदन पाटील यांच्या पश्चात काँग्रेस गट नेतृत्वहीन झाला आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील गटाचे घोरपडे यांच्या विकास आघाडीशी सख्य आहे. अशा परिस्थितीत भाजपचा सामना करण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.राष्टÑवादीचे वर्चस्वमिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. येथे काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्टÑवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. सरपंचांची थेट मतदारातून निवड होणार असल्याने, अनेक गावांतील समीकरणे बदलली आहेत. सरपंच पदासाठी चाचपणी सुरू झाली आहे.