शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या रणांगणात घाटमाथ्यावर सहकार पॅनेलला काँग्रेसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : घाटमाथ्यावरील कडेगाव आणि पलूस तालुक्यात कृष्णा साखर कारखान्याचे सभासद आहेत. या भागात भाजपचे अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : घाटमाथ्यावरील कडेगाव आणि पलूस तालुक्यात कृष्णा साखर कारखान्याचे सभासद आहेत. या भागात भाजपचे अर्थात सहकार पॅनेलचे दोन आणि संस्थापक पॅनेलचे एक असे तीन संचालक आहेत. रयत पॅनेलच्या डॉ. इंद्रजित मोहिते यांचे पतंगराव कदम घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध असून, आता कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या पाठिंब्यावर मोहिते गट सहकार पॅनेलला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

घाटमाथ्यावर सहा हजारच्या आसपास सभासद संख्या आहे. वांगी येथे पाचशेहून अधिक सभासद आहेत. पृथ्वीराज देशमुख गटाचे ब्रिजराज मोहिते (वांगी) सहकार पॅनेलकडून संचालक आहेत. चिंचणी येथे तीनशेहून अधिक सभासद असून, पांडुरंग होनमाने सहकार पॅनेलचे संचालक आहेत. माेहिते वडगाव येथील पांडुरंग मोहिते हे अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचे संचालक आहेत.

मागीलवेळी कदम घराण्याची भूमिका तटस्थ होती. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. रयत पॅनेलची ताकद वाढविण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते आता कदम घराण्याची मदत घेतील, असे संकेत आहेत. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची साथ ज्यांना मिळणार, त्यांचेच घाटमाथ्यावर वर्चस्व राहणार आहे. राज्यात सध्या महाआघाडीची सत्ता असून, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साखर कारखानदारांचे नेते आहेत. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या रणांगणावर जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी निवडणुकीत कदम घराण्याची मदत रयत पॅनेलला मिळाली, तर जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.