शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या अलकादेवी शिंदे विजयी

By admin | Updated: July 2, 2015 23:32 IST

दोघांची अनामत जप्त : बेडग जिल्हा परिषद पोटनिवडणूक, शिवसेना, अपक्षाचा पराभव

मिरज : बेडग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अलकादेवी केदारराव शिंदे पाच हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार उमेश पाटील यांचा पराभव केला. चौथ्या क्रमांकावर गेलेल्या शिवसेना उमेदवारासह एका अपक्षाची अनामत जप्त झाली. तहसील कार्यालयात गुरुवारी अर्ध्या तासात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.काँग्रेसचे सदस्य केदारराव शिंदे यांच्या निधनामुळे बेडग मतदारसंघात ही पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत केदारराव शिंदे यांच्या पत्नी व काँग्रेसच्या उमेदवार अलकादेवी शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेचे सुलेमान मुजावर, अपक्ष उमेदवार उमेश पाटील व आप्पासाहेब मोटे यांनी निवडणूक लढविली. तहसील कार्यालयात गुरुवारी मतमोजणी झाली. या लढतीत अपेक्षेप्रमाणे काँगेसच्या उमेदवार अलकादेवी शिंदे यांना मतदारांची सहानुभूती मिळाली. शिंदे यांनी ७ हजार ६२७ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. अपक्ष उमेदवार उमेश पाटील यांना २६७९ मते मिळाली. शिंदे यांनी तब्बल पाच हजाराच्या मताधिक्याने विजय मिळविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवसेना उमेदवार सुलेमान मुजावर यांना ३०९ व अपक्ष उमेदवार आप्पासाहेब मोटे यांना ६१२ मते मिळाली. मुजावर व मोटे यांची अनामत जप्त झाली. बेडग मतदारसंघातील म्हैसाळ, विजयनगर व बेडग या गावांतील २६ हजार मतदारांपैकी ११ हजार मतदान झाले होते. निवडणुकीत म्हैसाळ व बेडग येथील मतदारांनी आपल्या गावातील उमेदवारास मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला. उमेश पाटील यांना बेडगमध्ये व म्हैसाळमध्ये अलकादेवी शिंदेंना मतदारांनी मताधिक्य दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. (वार्ताहर)२६९ मतदारांचे नकारात्मक मतदानबेडग पोटनिवडणुकीसाठी ४३ टक्के मतदान झाले होते. मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळालेला असतानाच, २६९ मतदारांनी नकारात्मक (नोटा) मतदान नोंदविले. बेडगमध्ये ७७ व म्हैसाळमध्ये १६६ अशा २६९ मतदारांनी एकाही उमेदवारास पसंतीचे मत दिले नाही.म्हैसाळ ग्रामपंचायतीची निवडणूक २५ जुलैला होत आहे. त्यामुळे या विजयामुळे कार्यकर्ते सक्रिय झाल्याची चर्चा आहे.केदारराव शिंदे यांना श्रद्धांजली म्हणून गावात कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला नाही. फटाके, गुलाल लावणे आदी प्रकार पहायला मिळाले नाहीत.