शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

By admin | Updated: February 24, 2017 23:49 IST

तालुक्याचे चित्र : घोरपडेंच्या विकास आघाडीचा फुगा फुटला; भाजपचा पंचायत समितीवर झेंडा

सदानंद औंधे ल्ल मिरजमिरज तालुक्यात भाजपने जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीत दहा जागा जिंकून काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. मिरज पंचायत समितीत भाजपने सत्ता हस्तगत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मिरज पूर्व भागात राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढविणाऱ्या अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीचा फुगा फुटला आहे.मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ पैकी तब्बल सात ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे केवळ तीन सदस्य निवडून आले. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग, बेडग, म्हैसाळ या चारही जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने यश मिळविले. पश्चिम भागातील बुधगाव, कवलापूर, समडोळी येथे भाजपला यश मिळाले. गत जिल्हा परिषद निवडणुकीत दहापैकी आठ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. मिरज पूर्व भागात मालगाव व एरंडोली येथे बंडखोरांनी काँग्रेसला आव्हान दिले होते. काँग्रेसमधील बंडखोरीचा मालगावात फटका बसला. एरंडोलीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांना निसटता विजय मिळाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेला भाजप प्रवेश फायद्याचा ठरला आहे. मालगाव जिल्हा परिषदेसह गुंडेवाडी व मालगाव पंचायत समिती मतदारसंघात आयात उमेदवार निवडून आले आहेत. म्हैसाळमध्ये मनोज शिंदे व केदारराव शिंदे यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी गटाने एकत्रित येऊन निवडणूक लढविली होती. मात्र म्हैसाळ गटासह म्हैसाळ व टाकळी गणातून भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने, म्हैसाळातील सरकारांचे वर्चस्व संपुष्टात येऊन दीपकबाबा शिंदे गटाला यश मिळाले आहे. आरग येथे भाजपविरोधात एकत्र आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय आघाडीची मोट अयशस्वी ठरली. मात्र पश्चिम भागात राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना असा संघर्ष असल्याने, येथे भाजपला बुधगाव, कवलापूर व समडोळी गटात व पंचायत समितीत बुधगाव व इनाम धामणी या दोन पंचायत समिती मतदारसंघात विजय मिळाला आहे. गुंडेवाडी, मालगाव, नरवाड, खटाव, आरग, म्हैसाळ, टाकळी, इनाम धामणी, बुधगाव, बेडग पंचायत समिती मतदार संघात भाजपला यश मिळाले. सोनी, भोसे, सलगरे, बामणोली, कवलापूर, माधवनगर, कवठेपिरान, पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेस , समडोळी, कसबे डिग्रज येथे राष्ट्रवादी काँग्रेस, दुधगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, एरंडोलीत अजितराव घोरपडे यांची विकास आघाडी व नांद्रे मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आला. पंचायत समितीत भाजपचे दहा सदस्य निवडून आल्याने, पंचायत समिती स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मिरज पंचायत समितीत पहिल्यांदाच सत्ता गमावली आहे. मिरज पूर्व भागात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीसोबत निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत झाले. पूर्व भागात एकत्रित आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व विकास आघाडीला मतदारांनी नाकारले. अजितराव घोरपडे यांच्या एकमेव समर्थक शालन भोई एरंडोली पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. पंचायत समितीत आता त्या भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मिरज पंचायत समितीत भाजपला आणखी दोन सदस्यांची आवश्यकता असून, अपक्षांच्या मदतीने सत्ता हस्तगत करणे भाजपला शक्य होणार आहे.