शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा येथील भ्रष्टाचाराचा भांडाफोड काँग्रेसने केला उघड : नगरपंचायतकडून मर्जीतल्या लोकांंना मनमानी पध्दतीने टेंडर देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:32 IST

शिराळा : येथील नगरपंचायतीने दि. १२ जानेवारी २०१८ रोजी वाचनालयामागील बुरुड गल्ली येथील क्रॉस गटार करणे व खेड फाटा शिराळा येथे क्रॉस गटार करणे या कामासाठी टेंडर मागविले होते.

शिराळा : येथील नगरपंचायतीने दि. १२ जानेवारी २०१८ रोजी वाचनालयामागील बुरुड गल्ली येथील क्रॉस गटार करणे व खेड फाटा शिराळा येथे क्रॉस गटार करणे या कामासाठी टेंडर मागविले होते. परंतु टेंडर माहितीमध्ये त्याचे इस्टिमेट न देता स्वत:च्या मर्जीतील लोकांनी मनमानी रकमेने टेंडर मिळविण्याचा घाट घातला होता. या भ्रष्टाचाराचा भांडाफोड काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.

टेंडर भरणेची मुदत संपण्याआधीच कामे पूर्णही झाली होती. पैकी खेड फाटा येथील क्रॉस गटारीचे काम, तर शिराळ्याच्या हद्दीत देखील येत नसून फक्त पैसे मिळविण्यासाठी सत्ताधाºयांनी हे काम दाखवून भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी शिराळा तहसीलदार व प्रांताधिकारी तथा भ्रष्टाचार निर्मूलन अधिकारी यांना या कामाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी तरी भ्रष्टाचार झाल्याचे निर्दशनास आल्याने प्रांताधिकाºयांनी त्याचे पंचनामे करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार तहसीलदार यांनी मंडल अधिकारी अनंता भानुसे यांची नेमणूक करून, त्यांनी तात्काळ या सर्व कामांचे पंचनामे करून तसा अहवाल सादर केला आहे. पुढील चौकशी सुरु असून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिराळा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केली आहे.

हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सम्राटसिंह पृथ्वीराज शिंदे, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, माजी ग्रा.पं. सदस्य अजय जाधव, अभिजित यादव, कुलदीप निकम, रणजित नलवडे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.अहवाल : देणारपैकी खेड फाटा येथील क्रॉस गटारीचे काम, तर शिराळ्याच्या हद्दीत देखील येत नसून फक्त पैसे मिळविण्यासाठी सत्ताधाºयांनी हे काम दाखवून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत काँग्रेसने आवाज उठवला. यासाठीचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. प्रांताधिधकाºयांनी याबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.