शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

राष्ट्रवादीकडे पक्षादेशाचे धुपाटणे

By admin | Updated: September 11, 2016 00:26 IST

उशिराचे शहाणपण : तासगावात भाजपच्या नाराजांवर भिस्त; अर्जाची उत्सुकता

दत्ता पाटील -- तासगाव  नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीत भाजपमध्ये गटबाजी सुरू झाली. त्याचा फायदा घेण्यासाठी नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. भाजपच्या नाराजांवर भिस्त ठेवून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आला असला तरी, नाराजी कितपत पथ्यावर पडणार, यावरच अर्जाचे भवितव्य अवलंबून आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ता आणि कारभारी दोन्ही गमावल्यानंतर राष्ट्रवादीच्या हातात केवळ पक्षादेशाचे धुपाटणेच राहिले असून, पक्षादेश बजावण्याचे उशिराचे शहाणपण सुचल्याचे दिसून येत आहे. तासगाव नगरपालिकेत भाजपवाल्यांना सत्तेची बांधा झाल्यामुळे पक्षांतर्गतच सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. एका गटाला नगराध्यक्षपद दिल्याने दुसरा गट नाराज झाला आहे. याच नाराजीतून चार नगरसेवकांनी खासदार संजयकाकांकडे राजीनामे दिले आहेत. नगरसेवक अनिल कुत्ते यांची नाराजी दूर करण्यासाठी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले नगरसेवक राजू म्हेत्रेंसह अन्य काही पदाधिकारी काकांच्या आदेशानुसार कुत्तेंची मनधरणी करण्यासाठी गेले होते. मात्र त्यात त्यांना आतापर्यंत तरी यश आले नाही. दुसरीकडे भाजपमधील गटबाजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीतील नगरसेवकांची विस्कटलेली फळी एकसंध झाली आहे.त्यातूनच त्यांच्यात अतिआत्मविश्वास आल्याचेही दिसून येत आहे. निवडणूक नजरेसमोर ठेवून गेल्या आठ महिन्यांपासून कोमात असलेल्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदासाठीच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळेच नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी पक्षादेश बजावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.नगरपालिकेतील तीन काका गटाचे अनिल कुत्ते आणि शरद मानकर हे दोन नगरसेवक अपक्ष निवडून आले आहेत, तर अजय पवार काँग्रेसमधून निवडून आले आहेत. अन्य सर्व नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. यापैकी चार नगरसेवकांनी आठ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता, तर अमोल शिंदेचा अपवाद वगळता इतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षादेश झुगारुनच भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली होती. राष्ट्रवादीची अवस्था ‘तेलही गेले अन् तूपही गेले’ इतकी केविलवाणी झाली होती. भाजपमधील गटबाजीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला जोर चढला आहे. त्यामुळेच काँग्रेसचा नगराध्यक्ष पायउतार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांपैकी सुरेश थोरात यांनी अर्ज दाखल केला आहे, तर त्यातील अन्य दोघे अर्जासाठी सूचक, अनुमोदक झाले आहेत. राष्ट्रवादीची भिस्त असलेल्या नाराज गटालाच नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे. आता दुसऱ्या नाराज गटावर भिस्त बाळगली जात आहे. मात्र हा गट खासदारांचा आदेश झुगारण्याची तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून पक्षादेश बजावण्यासाठी हालचाल सुरू करण्यात आली आहे. आठ महिने पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांविरोधात कोणताच आवाज न उठवलेल्या, शहराध्यक्ष निवड न करू शकलेल्या राष्ट्रवादीला पक्षादेश बजावण्यासाठी जाग आली आहे. हे अवसान कितपत टिकणार, याबाबत साशंकता आहे. त्याचे नेमके चित्र अर्ज माघारीच्या दिवशीच (ता. १६) स्पष्ट होईल.महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अपात्रता कायद्यातील कलम १६ नुसार पक्षांतर बंदीबाबत झालेली कारवाई ही त्या टर्मपुरतीच मर्यादित राहते. विद्यमान सदस्यांची टर्म तीन महिन्यांत संपणार आहे. कारवाईच्या बडग्याचा परिणाम यावेळी होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पक्षादेशाची कारवाई प्रभावशून्य ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.