शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचारी भरतीवेळी गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९५ पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी मुलाखती आयोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९५ पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी मुलाखती आयोजित केल्या होत्या. उमेदवार आणि त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा परिषद परिसर आणि मुख्य इमारतीमध्ये मोठी गर्दी केली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे दिसत होते. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू असल्याने उमेदवार आणि नातेवाइकांनी गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ कमी केला.

जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातर्फे १९५ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदासाठी सोमवारी मुलाखती आयोजित केल्या होत्या. आयुष वैद्यकीय अधिकारी पदासाठी २५ पदे रिक्त असून, यासाठी ६१ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले होते. स्टाफ नर्सच्या १२० जागा असून, १९१ उमेदवारांचे अर्ज आले होते. आरोग्य सेविकांच्या ५० पदांसाठी २७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी दिवसभर गर्दी केली होती. त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते आणि सॅनिटायझरचाही वापर दिसत नव्हता.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार होती. मात्र, उमेदवारांची संख्या मोठी असल्याने विलंब लागला होता. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात गर्दीचे स्वरूप आले होते. जिल्ह्याच्या विविध भागांतून उमेदवार कंत्राटी भरतीसाठी आले होते. त्यांना गावाकडे परत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती, याशिवाय किती वेळ लागणार याबाबत माहिती नसल्याने रात्री सव्वाआठ वाजता जिल्हा परिषदेत उमेदवारांसह त्यांच्या नातेवाइकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रशासनाच्या वतीने सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु नातेवाईक ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गोंधळ कमी झाला. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.

चौकट

नियम सर्वांनीच पाळणे गरजेचे

कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि आरोग्य विभाग फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याबाबत आवाहन करीत आहे. मात्र, प्रशासनानेच जिल्हा परिषद मुख्यालयात सर्व नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टीका होत आहे.

फोटो : १२झेडपी : जिल्हा परिषदेत सोमवारी आरोग्य विभागाच्या कंत्राटी नोकर भरतीसाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.