शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सभेत भाजप नगरसेवकांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST

फोटो : २६ शीतल ०१ ते ०४ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, या मागणीसाठी ...

फोटो : २६ शीतल ०१ ते ०४

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. ऑनलाईन सभा सुरू असतानाच भाजपच्या सदस्यांनी सभागृहात शिरून गोंधळ घातला, तर महिला नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला होता. या गोंधळातच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सभा आटोपती घेतली.

महापालिकेतील सत्तांतरानंतर पहिलीच सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत गुंठेवारी समितीची स्थापना, प्रभाग समित्यांची पुनर्रचना असे विषय चर्चेला होते. या दोन्ही विषयांना भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. दरम्यान, ऑनलाईन सभेत रेंज नसल्याने अडथळे येत आहेत, असे सांगत सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह काही नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. लिंक का पाठवली नाही, नगरसेवकांचे बोलणे ऐकू येत नाही... अशा तक्रारी करत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर ठिय्या मारून बसलेल्या महिला नगरसेविकांही सभागृहात आल्या. ऑनलाईन सभा प्रलंबित ठेवून ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी करत भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणाही देण्यात आल्या. अखेर महापौरांनी अजेंड्यावरील विषय मंजूर करत सभा आटोपती घेतली. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांवर, पळ काढल्याचा आरोप केला.

चौकट

घोडेबाजारासाठी ऑनलाईन सभा : सिंहासने

अनेक नगरसेवकांना ऑनलाईन सभेची लिंक पाठवली नाही. महिला सदस्यांनाही बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे आम्ही सभागृहात जाऊन तक्रार केली. काँग्रेस-राष्ट्रवादीला ऑनलाईन सभेतून भ्रष्टाचार करायचा आहे. ज्या सोनेरी टोळीने मदन पाटील यांना बदनाम केले, ती टोळी महापालिकेत पुन्हा शिरली आहे. घोडेबाजार करून आघाडीने महापालिकेची लूट करण्यासाठीच सत्ता मिळविली आहे. त्यासाठीच ऑफलाईन सभा घेतली जात नसल्याचा आरोप विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी, स्वाती शिंदे यांनी केला.

चौकट

भाजप सत्ताकाळात गप्प का? : सूर्यवंशी

भाजपची सत्ता असताना गेले वर्षभर ऑनलाईन सभा झाल्या. त्यावेळी ऑफलाईन सभेसाठी भाजपने आग्रह का धरला नाही? सदस्य का गप्प होते? असा सवाल महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. सत्ता गेल्यानंतरच त्यांना ऑफलाईन सभेची आठवण झाली आहे. कोरोनामुळे राज्य शासनाने ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाने परवानगी दिल्यास ऑफलाईन सभाही घेऊ, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

चौकट

कायदेशीर कारवाईचा विचार

कोरोनामुळे राज्य शासनाने ऑनलाईन सभा घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नुकतेच उच्च न्यायालयातही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. शासन आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून ऑफलाईन सभेसाठी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. याबाबत प्रशासनाकडून अहवाल घेऊन कायदेशीर कारवाईचा विचार असल्याचेही महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.