शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

आपसातील संघर्षाने सत्तेचा गोंधळ

By admin | Updated: March 8, 2016 00:52 IST

महापालिकेत यादवी : मदनभाऊ गटाला शह देण्याच्या हालचाली

सांगली : महापालिकेच्या राजकारणात आतापर्यंत सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष सांगलीकरांनी अनुभवला असेल. पण आता सत्ताधारी काँग्रेसमधीलच दोन गटात यादवीची शक्यता आहे. पालिकेत काँग्रेसची सत्ता असली तरी, सत्ताधारी मदनभाऊ पाटील यांचा गट आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या एका गटाने स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याबरोबरच पाटील गटाला शह देण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगला, तर नवल नाही. मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्याचा प्रत्यय महापौर, उपमहापौर निवडीवेळी आला. अगदी मदनभाऊ यांच्याशी एकनिष्ठ म्हणून मिरविणाऱ्या नगरसेवकांनीही त्यांच्या पश्चात बंडाचे निशाण हाती घेतले. शिवाय मदनभाऊंनी ज्यांना प्रतिष्ठा दिली, पदे दिली, ती मंडळीही आता त्यांच्याविरोधात गटा-तटाचे राजकारण करू लागली आहेत.या साऱ्यावर मात करीत मदनभाऊ गटाने महापौर निवडीत बाजी मारली. मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्यावर निष्ठा असलेल्या नगरसेवकांची संख्या आजही अधिक आहे. त्यात हा गट एकसंधपणे साऱ्या आव्हानांना सामोरा जात आहे. जयश्रीताई पाटील यांच्या शब्दाखातरच हारूण शिकलगार यांची महापौरपदी निवड झाली, हेही नाकारून चालणार नाही. उपमहापौरांची निवड होताना मात्र बरेच राजकारण घडले. महापौर, उपमहापौरांची निवड होऊन महिन्याचा कालावधी लोटला नाही तोपर्यंतच अंतर्गत धुसफूस वाढली आहे. उपमहापौरांनी स्वतंत्र बैठका घेऊन सवतासुभा मांडला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर पालिकेच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व गटनेता अशी चार संस्थाने पालिकेत आहेत. त्यापैकी महापौर व स्थायी समिती सभापती हे मदनभाऊ गटाचे मानले जातात. उपमहापौर विजय घाडगे हे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील गटाचे आहेत. वर्षभरापूर्वी माजी महापौर विवेक कांबळे व स्थायी समितीचे माजी सभापती संजय मेेंढे यांच्यात संघर्ष उफाळला होता. आताही तशीच परिस्थिती आहे. केवळ पदाधिकारी बदलले आहेत. भविष्यात महापौर, स्थायी समिती सभापती विरुद्ध उपमहापौर असा संघर्ष सुरू झाल्यास नवल वाटू नये. हा संघर्ष केवळ महापालिकेपुरताच मर्यादित राहणार नाही. (प्रतिनिधी)जयश्रीतार्इंची कोंडीमहापालिकेच्या राजकारणात नवख्या असलेल्या जयश्रीताई मदन पाटील यांची राजकीय कोंडी करण्याच्या हालचाली काँग्रेसमधून सुरू आहेत. पण जयश्रीतार्इंच्या पाठीशी मदनभाऊनिष्ठ कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. काही नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य बनविण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे भविष्यात सत्ताधारी गटावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू शकतात.