शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आष्ट्यात उड्डाणपुलास विरोध

By admin | Updated: April 20, 2017 00:12 IST

नगरपालिका सभा : पाणी नळास मीटर बसवणार; तिमाही पाणीपट्टी आकारणी

आष्टा : आष्टा शहरातून जाणाऱ्या पेठ-सांगली मार्गावर शासनाच्यावतीने उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. तसेच हा रस्ता सहापदरी करण्यात येणार आहे. त्यास आष्टा पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सभेत विरोध करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्नेहा माळी होत्या. यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील, उपनगराध्यक्ष विशाल शिंदे व नगरसेवक उपस्थित होते.सभेत नळास मीटर बसवून तिमाही पाणीपट्टी आकारणी करण्याचा तसेच पिवळ्या पट्ट्यातील सर्व नागरिकांना घरपट्टी लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आष्टा पालिकेच्या १६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सभा पालिकेबाहेर जलसिंचन भवन येथे घेण्यात आली पेठ-सांगली राष्ट्रीय मार्ग आष्टा शहरातून जातो. हा मार्ग सहापदरी करण्याबरोबरच येथून शैलेश सावंत, राज पेट्रोल पंप ते हॉटेल साई गार्डनपर्यंत उड्डाण पूल करण्यात येणार आहे. याचे शासनाकडून सर्वेक्षण झाले आहे, मात्र याला आष्टा पालिकेच्या सभेत विरोध करण्यात आला. तसेच विकास आराखड्यात शहराच्या बाजूने ४५ मीटर रिंग रोड आहे, त्या ठिकाणी सहापदरी रस्ता करण्यास मंजुरी देण्यात आली.आष्टा पालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे. या योजनेच्या नळ कनेक्शननजीक मीटर बसवण्यात आली आहेत. त्याचे तीन महिन्यास रिडिंग घेऊन त्याप्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. त्यासाठी ठेका देण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. शहराच्या पिवळ्या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना घरपट्टी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.आष्टा शहरास मर्दवाडी येथून कृष्णा नदीवरून पाणी आणले आहे. येथील जॅकवेलच्या मुख्य जलवाहिनीस मीटर बसवण्यास मंजुरी देण्यात आली. शहराच्या उपनगर व मळे भागात पाणी पुरवठ्यासाठी पोटवाहिन्या करण्यासह विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. फिश मार्केटनजीक मोकळ्या गाळ्यात मटण मार्केट सुरू करण्यास तसेच सिद्धार्थनगर येथील जीर्ण तक्क्याच्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी अनुसूचित जाती-जमातीसाठीचा पाच टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमलिंग तलावासाठी सरोवर संवर्धन योजनेतून अडीच कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यापैकी ५० लाख रूपये पालिकेला मिळाले आहेत, ते काम सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. चौदाव्या वित्त आयोगामधील ३ कोटी ७८ लाख रूपयांमधून विविध विकास कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. रस्ते व गटारी साफ करण्याच्या कामासाठी ६४ लाख व कचरा गोळा करणे कामासाठी ४२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी मंगलादेवी शिंदे, झुंझारराव पाटील, शेरनवाब देवळे, अर्जुन माने, वीर कुदळे, विमल थोटे, पुष्पलता माळी, जगन्नाथ बसुगडे, धैर्यशील शिंदे, विजय मोरे, शैलेश सावंत, संगीता सूर्यवंशी, सारिका मदने, तेजश्री बोन्डे, वर्षा अवघडे, मनीषा जाधव, चंद्रकांत पाटील, पोपट हाबळे, एस. डी. कांबळे, आर. एन. कांबळे, संजय बागणे उपस्थित होते.