शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनच्या निधीवरून महासभा-स्थायीमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

सांगली : जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर दहा कोटींच्या विकास निधीवरून महासभा विरुद्ध स्थायी समिती असा संघर्ष निर्माण झाला आहे. ...

सांगली : जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर दहा कोटींच्या विकास निधीवरून महासभा विरुद्ध स्थायी समिती असा संघर्ष निर्माण झाला आहे. महापौर गीता सुतार यांनी तहकूब महासभेत ऐनवेळच्या विषयात हा प्रस्ताव मंजूर केल्याने स्थायी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा नियोजनमधून मंजूर निधीचे वाटप स्थायी समितीकडून केले जात होते. ‘स्थायी’चे सोळा सदस्य आणि आणि काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या पदरात हा निधी जात होता. त्यामुळे स्थायी सदस्यांचीच विकासकामे मोठ्या प्रमाणात होत होती. वास्तविक जिल्हा नियोजनमधून येणाऱ्या विकासकामाच्या मंजूर निधीचा ठराव महासभेने करावा, असे स्पष्ट केलेले असताना स्थायी समिती विकासकामाचे प्रस्ताव तयार करून मंजूर करत होती. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे काही नगरसेवकांनी तक्रार केली. पाटील यांनी जिल्हा नियोजनच्या निधीच्या प्रस्तावाला महासभेचा ठराव घेण्याचे आदेश दिला. त्यामुळे स्थायीचे सदस्य मोठ्या निधीला मुकले. त्यात महापौर सुतार यांनी गत तहकूब सभेत हा प्रस्ताव मंजूर केला. वास्तविक तहकूब सभेत ऐनवेळचे विषय घेता येत नाहीत तरीही महापौरांनी मंजुरी दिल्याने स्थायी समितीचे सदस्य नाराज झाले. त्यांनी या ठरावाला विरोध करीत आयुक्तांना तसे पत्रही दिले आहे. आता आयुक्त यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.