शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौरांच्या संस्थांवर जप्ती

By admin | Updated: August 9, 2016 23:51 IST

घरपट्टीची थकबाकी : सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयावर आज कारवाई

सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी माजी महापौर सुरेश पाटील यांच्याशी संबंधित शिक्षण संस्था व वसतिगृहाकडील १९ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी जप्तीची कारवाई करण्यात आली. संस्थेने थकबाकीची रक्कम भरल्यानंतर कारवाई थांबली. दरम्यान, मिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयावरही कारवाई करण्यात आली असून, बुधवारी जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता व एलबीटीच्या थकीत कराच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. थकबाकी वसुलीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सोमवारी वसुली आढावा बैठकीत पाणीपुरवठा अभियंत्यासह पाच जणांना नोटिसा बजाविल्या होत्या. घरपट्टी विभागाकडील वसुली अधिकाऱ्यांनाही आयुक्तांनी धारेवर धरले होते. त्यानंतर घरपट्टी विभागाने मंगळवारी कारवाईची मोहीम तीव्र केली. माजी महापौर सुरेश पाटील यांच्याशी संबंधित ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलची १४ लाख, तर कस्तुरबाई वालचंद वसतिगृहाची ८ लाख, अशी २२ लाख रुपयांची थकबाकी होती. या थकबाकी वसुलीसाठी घरपट्टी विभागाने अनेकदा नोटिसा बजाविल्या होत्या. गेल्याच आठवड्यात संस्थेकडून तीन लाख रुपये भरण्यात आले होते. उर्वरित रक्कम भरण्यास मात्र टाळाटाळ सुरू होती. त्यामुळे मंगळवारी घरपट्टी विभागाने थेट जप्तीची कारवाई केली. महापालिकेचे पथक संस्थेत दाखल होताच थकीत १९ लाख रुपये रकमेचा धनादेश देण्यात आला.त्यानंतर घरपट्टी विभागाने आपला मोर्चा मिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयाकडे वळविला. या रुग्णालयाकडे ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे. सिद्धिविनायक ट्रस्टने वारंवार घरपट्टीत सवलत देण्याची मागणी केली आहे. पण लेखापरीक्षणातील आक्षेपामुळे महापालिका प्रशासनाने सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यातून थकबाकी भरण्यासाठी नोटिसा बजावूनही रकमेचा भरणा केलेला नाही. रुग्णालय व्यवस्थापनाने आयुक्तांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सायंकाळी आयुक्त खेबूडकर व रुग्णालय व्यवस्थापन यांच्यात बैठक झाली. आयुक्तांनी कर भरण्यासाठी मुदत देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पैसे भरल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने चर्चा फिसकटली. महापालिकेने बुधवारी रुग्णालयातील व्यवस्थापन कक्षाला सील ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. या कारवाईत जप्ती अधिकारी प्रकाश कोळी, रघुवीर हलवाई, अभिजित सटाले, अशोक मुळीक यांच्या पथकाने भाग घेतला होता. (प्रतिनिधी)एका दिवसात ३४ लाखांची वसुलीघरपट्टी विभागाने मंगळवारी एका दिवसात ३४ लाखांची वसुली केली. यात जप्ती कारवाईतील १९ लाखाचा समावेश आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यातील वसुली तीन कोटीने वाढली आहे. आतापर्यंत ७ कोटी रुपयांची वसुली घरपट्टी विभागाने केली आहे. जुलै महिन्यातच २ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली झाली आहे.रॉकेल लाईन भाडेपट्टीवर १८ ला निर्णयशहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रॉकेल लाईनच्या भाडेपट्टीबाबत मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी झाली. महापालिकेने बजाविलेली वाढीव भाडेपट्टीची नोटीस चुकीची असल्याचा युक्तिवाद येथील व्यावसायिकांनी केला. या व्यावसायिकांकडे १ कोटी १० लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने त्यांना वाढीव भाडेपट्टीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण नंतर ही याचिका मागे घेण्यात आली. आता भाडेपट्टीबाबत १८ रोजी अंतिम निर्णय होणार आहे.