शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीयता, गोंधळचक्रात महायुतीचे इच्छुक

By admin | Updated: August 28, 2014 23:04 IST

विधानसभा निवडणूक : अनिश्चिततेच्या भोवऱ्यात राजकीय स्वप्ने

अविनाश कोळी-सांगली -काँग्रेस आघाडीत रितसर पक्षीय नियमांप्रमाणे मुलाखतींचे कार्यक्रम पार पडले असताना, महायुतीत मात्र, गोपनीयता व गोंधळचक्रात इच्छुकांची स्वप्ने फिरत आहेत. भाजपने अर्ज व मुलाखतींबाबत गोपनीयता बाळगली आहे, तर शिवसेनेत थेट सेना भवनातून तिकीटनिश्चिती केली जात आहे. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या आरपीआय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागाच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांच्याकडील इच्छुकांचे वांदे झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे एकूण ५३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांच्या मुलाखतींचे पक्षीय स्तरावर स्वतंत्र कार्यक्रम पार पडले आहेत. जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी, या दोन्ही पक्षांनी निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे. महायुतीत मात्र गोंधळाचे वातावरण दिसत आहे. भाजपकडे सांगली जिल्ह्यातून आठही मतदारसंघांसाठी एकूण अंदाजे ३५ अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात दाखल झालेले अर्ज आणि इच्छुकांच्या मुलाखती याबाबत पक्षीय स्तरावर गोपनीयता बाळगण्यात आल्याचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या गोपनीयतेचे कारण त्यांना देता आले नाही. शिवसेनेत अजूनही पदाधिकारी निवडीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अर्ज दाखल कुठे करायचे?, त्यांच्या मुलाखती कोण घेणार?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. तरीही शिवसेनेतील विधानसभेची उमेदवारी आता थेट सेना भवनातूनच निश्चित केली जात आहे. ज्या नेत्यांना पक्षात प्रवेश घ्यायचा आहे व ज्यांना निवडणूक लढवायची आहे, अशा राजकीय नेत्यांनी थेट उध्दव ठाकरेंची भेट घेणे पसंत केले आहे. आजवर जिल्ह्यातील अशा अनेक नेत्यांनी पक्षप्रवेशाचे निर्णय सेना भवनावरच घेतले. त्यामुळे अर्ज, मुलाखती अशा भानगडीच त्यांनी ठेवल्या नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआयला अद्याप किती व कोणत्या जागा मिळणार, याची खात्री नाही. त्यामुळे स्वाभिमानीकडून निवडणूक लढवू पाहणाऱ्यांची संभ्रमावस्था दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपने सर्वच जागांसाठी अर्ज मागविले होते. भाजप व सेनेने जिल्ह्यातील पाच जागांवर दावा केल्याने अंतिम जागावाटपानंतर नाराजीत आणखी भर पडणार आहे.