शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जिल्हा काँगे्रससमोर सक्षम नेतृत्वाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:39 IST

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच, पतंगरावांच्या निधनामुळे पक्षाला हादरा बसला आहे.महापालिकेच्या २0१३ च्या निवडणुकीत पतंगराव कदम प्रथमच ...

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच, पतंगरावांच्या निधनामुळे पक्षाला हादरा बसला आहे.महापालिकेच्या २0१३ च्या निवडणुकीत पतंगराव कदम प्रथमच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या बहुतांश प्रभागात फिरले होते. उमेदवार असलेल्या आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी पाठबळ दिले होते. तिन्ही शहरातील नागरिकांनी पतंगरावांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसला एकहाती सत्ता सोपविली. तिकीट वाटपाची जबाबदारी मदन पाटील यांच्यावर सोपविली होती, तरी प्रचाराची संपूर्ण धुरा पतंगरावांनी सांभाळली होती. महापालिकेतील यशानंतर विधानसभेतही त्यांचे अभिनंदन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले होते.महापालिकेची यंदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. त्याची तयारी आता सुरू झाली आहे. ही निवडणूकसुद्धा पतंगरावांच्या नेतृत्वाखालीच लढविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेत्यांनी केला होता. आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे, याचे अधिकारही पतंगरावांनाच दिले होते. अनेक इच्छुकांचीही सारी मदार पतंगरावांवर होती. एकीकडे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच पतंगरावांचे निधन झाले. ही घटना काँग्रेससाठी हादरा देणारी ठरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. मदन पाटील यांच्यानंतर केवळ पतंगरावच महापालिका क्षेत्रातील काँग्रेसला ताकद देऊ शकले असते. आता मदन पाटील यांच्यापाठोपाठ पतंगरावांचेही निधन झाल्याने नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षाच्या नियोजनातही विस्कळीतपणा येण्याची दाट शक्यता आहे. विरोधी पक्षांकडे ताकदीचे नेते असल्यामुळे सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसचे काय होणार, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.पक्षात दुसºया फळीतील नेत्यांकडे अनुभवाची कमतरता आहे. दुसºया फळीतील नेत्यांचीही मदार पतंगरावांवरच अधिक होती. त्यामुळे दुसºया फळीतील नेत्यांमध्येही हीच अस्वस्थता दिसून येत आहे. महापालिकेच्या इतिहासात, आजवर निवडणुकांचा काळ आला की पक्षांतर्गत मतभेद, रुसवा-फुगवीचा खेळ नेहमीच होतो. अशावेळी कार्यकर्त्यांना शांत करून खंबीरपणे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व कामी येत राहिले. आता तशी भूमिका बजावणारे नेतृत्व नाही. जे नेते आहेत, त्यांच्याकडे महापालिका निवडणुकीचा अनुभव फारसा नाही.गटबाजीचे आव्हानमहापालिकेच्या राजकारणात काँग्रेसला नेहमीच गटबाजीची चिंता सतावत राहिली. कडेगावला एका बैठकीत सर्व नगरसेवकांची पतंगरावांनी याच गटबाजीबद्दल कानउघाडणी केली होती. त्यानंतर महापालिकेतील चित्र काही काळ बदलले होते. पतंगरावांचा आदेश दोन्ही गटातील नगरसेवक मानत होते. आता हा समन्वय साधणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.