शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभेसाठी आघाडीत तडजोडीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:25 IST

सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यांतर्गत विधानसभेच्या जागांची अदलाबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेची मागणी व्यक्त केली होती. दुसरीकडे जत विधानसभा मतदारसंघाची ...

सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यांतर्गत विधानसभेच्या जागांची अदलाबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेची मागणी व्यक्त केली होती. दुसरीकडे जत विधानसभा मतदारसंघाची जागाही काँग्रेस नेत्यांनी आपल्याकडे राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यामुळे, दोन्ही निवडणुकांसाठी जागांची अदलाबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सतेज पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राष्टÑवादीकडील कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली, तर काँग्रेसकडील सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा राष्टÑवादी मागू शकते. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अशा प्रकारच्या मागणीला तीव्र विरोध होऊ शकतो. त्याचप्रकारच्या विरोधाचा सामना कोल्हापुरातही करावा लागणार आहे. त्यामुळे मागण्या व चर्चांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व पक्षाचे प्रमुख नेते सावध झाले आहेत.जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे या जागेवरील काँग्रेसची दावेदारी आक्रमकपणे होताना दिसत आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी जतच्या जागेच्या बदल्यात मिरज विधानसभेची जागा राष्टÑवादीला देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील काँगे्रस व राष्टÑवादीचे इच्छुक, पदाधिकारी व कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. पक्षीय नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असला तरी, विरोध व संघर्षाची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत. जागांची अदलाबदल केवळ या चार मतदारसंघांपुरतीच राहणार नसून, अन्य मतदारसंघातही अशाचप्रकारच्या चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. निवडणुका लांब असल्या तरी, आतापासूनच आघाडीतील नेत्यांनी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जयंत पाटील : सामंजस्याने निर्णय घेणारसांगलीत जयंत पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, त्याठिकाणची जागा मित्रपक्षाला सोडण्याबाबत विचार होईल. याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. तरीही भविष्यात याबाबत सामंजस्याने, निवडून येण्याची क्षमता व परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातील.आघाडी गृहीत धरून सूचना!काँग्रेस व राष्टÑवादी या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, त्यांनी आघाडी होणार असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत आग्रही असलेल्या या दोन्ही नेत्यांकडून ऐनवेळी जागांची अदलाबदल करून आघाडीच्या चर्चा यशस्वी केल्या जाऊ शकतात.