शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रुजतेय गणेशमूर्ती दान संकल्पना

By admin | Updated: September 13, 2016 00:47 IST

महापालिकेच्या उपक्रमाला यश : तीन दिवसात तीन हजार मूर्ती, ५० टन निर्माल्य दान; कुंडातील विसर्जनालाही प्राधान्य--लोकमत विशेष

सांगली : कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य दान मोहिमेला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एक हजार गणेशमूर्ती जास्त प्राप्त झाल्या आहेत. पाचव्या, सहाव्या व सातव्या असा तीन दिवसांत पालिकेला तीन हजार मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या, तर ५० टन निर्माल्य गोळा झाले आहे. एकीकडे सांगलीकरांनी मूर्ती व निर्माल्य दान मोहिमेला प्रतिसाद दिला असताना, मिरजेत मात्र याबाबत उदासीनता दिसून येत आहे. कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत शासकीय यंत्रणांकडून वारंवार महापालिका प्रशासनाचे कान उपटले आहेत. कधी शेरीनाल्यातून, तर कधी सांडपाणी थेट नदीत सोडल्याप्रकरणी महापालिकेवर लाखो रुपये दंडाची कारवाई झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात महापालिकेची यंत्रणाही सतर्क झाली होती. विविध सेवाभावी संस्था-संघटनांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. घरोघरी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. महापालिकेने गणेश विसर्जनाचीही जय्यत तयारी केली. सांगली व मिरजेत कृष्णा नदीतच मोठ्या प्रमाणात श्रींच्या मूर्तींचे विसर्जन होत असते. त्यासोबतच निर्माल्यही नदीतच टाकले जाते. कृष्णेचे जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. त्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. महापालिकेच्यावतीने गणपती विसर्जनाकरिता निश्चित केलेल्या ठिकाणांवर निर्माल्य व गणेशमूर्ती दान करण्याची मोहीम राबविली. जलप्रदूषण टाळण्यासाठी बहुतांश नागरिकांकडून मूर्ती दान केल्या जात आहेत व निर्माल्य जमा करण्यात येत आहे. महापालिकेने गव्हर्न्मेंट कॉलनीतील हसनी आश्रम बसस्टॉप, महादेव मंदिर, विश्रामबागला हॉटेल पै प्रकाशच्या मागे, वाडीकर मंगल कार्यालयासमोर, सह्याद्रीनगर येथे दत्त मंदिर, संजयनगर येथील बिरनाळे हायस्कूल या उपनगरांत कृत्रिम कुंड तयार केले. तसेच माई घाट, सरकारी घाट, विष्णू घाट, सांगलीवाडी घाट यांसह मिरजेतील गणेश तलाव परिसरातही मूर्ती व निर्माल्य दान करण्यासाठी यंत्रणा उभारली. महापालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.मागीलवर्षी दोन हजार मूर्ती दान स्वरूपात महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाच्या पाचव्या, सहाव्या व सातव्या दिवशी घरगुती गणपतींसह अनेक मंडळांच्या श्रींचे विसर्जन झाले आहे. या तीन दिवसात पालिकेला २८३० मूर्ती दान स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. पाचव्या दिवशी ८३०, सहाव्या दिवशी ९००, तर सातव्या दिवशी ११०० मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या.मूर्तीसोबतच निर्माल्य दान करण्यासाठीही नागरिकांनी प्रतिसाद दिला. तीन दिवसात सांगलीत ३५ टन, तर मिरजेत १७ टन निर्माल्य जमा झाले आहे. निर्माल्य व गणेशमूर्ती दान करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांची मदत महापालिकेला लाभली. (प्रतिनिधी)मिरजेत अत्यल्प प्रतिसादसांगलीकरांनी गणेशमूर्ती व निर्माल्य दान करण्यासाठी जोरदार प्रतिसाद दिला असताना, मिरजेतून मात्र या मोहिमेला अपेक्षित यश मिळालेले नाही. महापालिकेने मिरजेतील गणेश तलावासह काही ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे, पण मिरजेत मात्र मूर्ती दान करण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. विसर्जनाच्या तीन दिवसात मिरजेतून १७ टन निर्माल्य जमा झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले.