लोकमत न्यूज नेटवर्क
चरण : वारणा व मोरणा नदीला आलेला पूर ओसरताच प्रशासनाने तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले. आरळा (ता. शिराळा) येथील मुख्य बाजारपेठेची पाहणी केली.
नाईक म्हणाले, पुरामुळे शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमीन पूर्णपणे खचून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आरळा, देववाडी, मांगले, सागाव या गावांमध्ये नागरिकांना जनावरांसह स्थलांतरित व्हावे लागले. त्यांना तत्काळ शासनाने मदत द्यावी. प्रशासनाने पूर परिस्थितीची फक्त पहाणी न करता थेट वस्तुनिष्ठ पंचनामे करून सरसकट नागरिकांना मदत करण्याची गरज आहे.
यावेळी अशोक बेर्डे, कृष्णा बेर्डे, बाबुराव गावडे, पोपट खोत, सरपंच सखाराम दुर्गे, संचालक प्रकाश जाधव, माजी उपसभापती एन. डी. लोहार, कैलास पाटील, हिंदुराव नांगरे, संचालक मोहन पाटील, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस विकास शिरसट आदी मान्यवर उपस्थित होते.