शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर विकासकामे पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 00:02 IST

रश्माक्का होर्तीकर : जिल्हा परिषदेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक

सांगली : जिल्ह्यातील विकास कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला असून त्याचा वापर होणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष संपण्यास थोडाच कालावधी शिल्लक असल्याने, खाते प्रमुखांनी मंजूर निधीतून विकासकामे पूर्ण करावीत, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी दिले. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली खातेप्रमुख व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी होर्तीकर यांनी कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. होर्तीकर म्हणाल्या की, आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी उरल्याने सर्व खातेप्रमुखांनी तातडीने कामाचे नियोजन करत विकास कामांसाठी निधीचा योग्य तो विनियोग करावा. विकासकामांत कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी इतरही काही मुद्यांवर चर्चा झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याची खरेदी करताना यापुढे स्थानिक बाजारपेठेतून दराची खात्री करुन घेऊन मगच प्रस्ताव सादर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यावेळी सभापती गजानन कोठावळे, सभापती पपाली कचरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)दराची चौकशी : त्यानंतरच साहित्य खरेदीजिल्हा परिषदेत सध्या गाजत असलेल्या शिलाई यंत्र खरेदी घोटळ्याच्या आरोपावरुन गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत लाभार्थ्यांसाठी साहित्याची खरेदी करताना स्थानिक बाजारपेठेत त्या साहित्याच्या दराची खात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. दराची खात्री करुनच प्रस्ताव सादर करण्याचा आदेशही देण्यात आले. या निर्णयामुळे प्रशासन व पदाधिकारीही सतर्क झाले आहेत.