शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात जमीन विक्रीत कोटीची फसवणूक चौघाजणांविरुद्ध पोलिसांत तक्रार

By admin | Updated: January 8, 2016 01:32 IST

नगराध्यक्षा शिंदेंसह पाचजणांना दुसऱ्यांदा विक्री

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील ५२ एकर शेतजमीन पूर्वी ठरलेल्या खरेदीदाराशिवाय दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याप्रकरणी आष्टा येथील कृष्णराव शिवाजीराव थोरात व त्यांच्या कुटुंबीयांवर आष्टा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही जमीन आष्ट्याच्या नगराध्यक्षा मंगला विलासराव शिंदे व इतर पाचजणांनी खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, रोहित भरत निलाखे (वय २८, रा. वखारभाग, सांगली) यांनी एक कोटी १९ लाख सात हजारांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारंदवाडी (ता. वाळवा) परिसरात कृष्णराव शिवाजीराव थोरात (सरकार) यांच्या पत्नी अनुराधा, मुले पृथ्वीराज व ऋतुराज यांच्या नावे ही जमीन आहे. या जमिनीबाबत २०१२ मध्ये रोहित निलाखे यांच्याशी प्रति एकर दोन लाख तीन हजार याप्रमाणे थोरात यांचा व्यवहार ठरला होता. या जमिनीची एकूण रक्कम एक कोटी १९ लाख सात हजार अशी ठरली होती. यापैकी करारावेळी थोरात यांना निलाखे यांनी वेळोवेळी ७९ लाख ४९ हजार १७० रुपये दिले होते. उर्वरित रक्कम, जमिनीसंदर्भातील सर्व शासकीय परवाने घेऊन जमीन विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचे ठरले होते, असे असतानाही कृष्णराव थोरात व त्यांच्या कुटुंबीयांनी या जमिनीचा व्यवहार रोहित निलाखे यांच्याशी पूर्ण न करता, त्यांना कोणतीही कल्पना न देता ही जमीन नगराध्यक्षा मंगला विलासराव शिंदे (रा. आष्टा), अशोक रामचंद्र पाटील (रा. नेर्ले), सुनील ज्ञानदेव पाटील (रा. भडकंबे), शशिकांत शंकर सोकाशी (रा. बागणी), प्रशांत उत्तुरे, कविता उत्तुरे (दोघे रा. मिरज) यांना ३१ डिसेंबर २०१५ ला परस्पर विकली. याबाबत रोहित निलाखे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये कृष्णराव शिवाजीराव थोरात व त्यांच्या कुटुंबीयांवर भा.दं.वि. कलम ४२०, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)नगराध्यक्षा शिंदेंसह पाचजणांना दुसऱ्यांदा विक्रीथोरात यांनी निलाखे यांच्याकडून अ‍ॅडव्हान्स रकमा घेऊनही आष्ट्याच्या नगराध्यक्षा मंगला विलासराव शिंदे यांच्यासह पाचजणांना ही जमीन विकली आहे. त्यांचीही या प्रकरणात फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.