शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सहा भू-विकास बँकांवर सक्षमतेचा शिक्का

By admin | Updated: July 15, 2014 00:50 IST

समिती अहवाल : कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बीड, उस्मानाबाद येथील बँकांचा समावेश; शासनाकडे शिफारशी

अविनाश कोळी ल्ल सांगलीराज्यातील भू-विकास बँकांबाबत अभ्यास करण्यासाठी नियुक्त समितीने सादर केलेल्या अहवालात राज्यातील सहा बँका सक्षम असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बीड, उस्मानाबाद या जिल्हा बँकांचा समावेश आहे. सभासद येणे कर्ज, गुंतवणूक, रोकड व बँक शिल्लक यातून या बँका शिखर बँकेचे कर्ज भागवू शकतात, असे समितीने म्हटले आहे. भू-विकास बँक येणी देणी समितीने पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात जिल्हा बँकांच्या सक्षमीकरणाच्यादृष्टीने अनेक दिलासादायक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. जिल्हा बँकांच्या डोईवर २ हजार ११३ कोटी ३0 लाख रुपये शिखर बँकेचे कर्ज व व्याज आहे. याउलट जिल्हा बँकांनी सभासदांना दिलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम ८५१ कोटी ६९ लाख इतकी होते. शिखर बँकेचे देणे व जिल्हा बँकांची थकित येणी यांचा विचार केला, तर १२६१ कोटींची अनिष्ट तफावत दिसून येते. सहा बँकांचा आर्थिक ताळेबंद सक्षम असला तरी, उर्वरित २३ बँकांना शिखर बँकेचे कर्ज भागविण्यासाठी स्थावर व जंगम मालमत्ता वापरावी लागेल. राज्य शासनाने शिखर बँकेला दिलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावर व्याजाची मागणी केली आहे. दुसरीकडे शासनाने राबविलेल्या विविध सवलतींच्या योजनांमुळे जिल्हा बँकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. याची रक्कम ६८१ कोटी २७ लाख रुपये आहे. सवलतीपोटी झालेल्या नुकसानीची रक्कम शासनाने शिखर बँकांना अद्याप दिलेली नाही. त्यामुळे या थकित रकमेवर शासनानेही बँकांना व्याज द्यावे, अशी मागणी आता होत आहे. व्याजाचा हा वाद सोडविण्यासाठी काही पर्याय समितीने दिले आहेत. शिखर बँक व जिल्हा बँकांची एकत्रित जिंदगी (आर्थिक गोळाबेरीज व एकूण मालमत्ता) १२९९ कोटी १८ लाख इतकी आहे. दुसरीकडे शासनाची एकूण देणी १७९१ कोटी ७ लाख इतकी आहेत. शासनाची सर्व देणी भागविण्यासाठी या बँकांना ४९१ कोटी ८९ लाख रुपये कमी पडत आहेत. यातून मार्ग काढायचा असेल, तर शासनाकडून बँकांना मिळालेल्या अल्पमुदत कर्जावरील ७२२ कोटी ५ लाखाचे व्याज ‘सॉफ्ट लोन’ म्हणून मान्य केल्यास शिखर बँक तोट्याऐवजी फायद्यात येऊ शकते.