पेठ (ता. वाळवा) येथील नायकल वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतुल पाटील, शरद पाटील. नामदेव कदम, सुमित पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नातून नायकल वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ युवक नेते विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी केली जात होती. यामुळे हा शेतकरी मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी अतुल पाटील, उद्योजक शरद पाटील, कृष्णा बँकचे संचालक नामदेव कदम, आत्मशक्ती पतसंस्थेचे संचालक संजय पाटील, हर्षद पाटील, सुमित पाटील, शहाजी नायकल, प्रदीप पाटील, तुळशीदास पिसे, अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद गावडे, प्रकाश शेलार, पतंग पाटील, रंगराव केवळे, काकासाहेब नायकल उपस्थित होते.