शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात रंगल्या ताबूत भेटी

By admin | Updated: October 25, 2015 00:42 IST

भाविकांची गर्दी : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

कडेगाव : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा अनोखा सोहळा शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ‘प्यारा प्यारा हमारा देश न्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम एक रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला. मोहरमनिमित्त येथे गगनचुंबी ताबूतांच्या भेटी झाल्या. हा सोहळा पाहण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक आले होते. सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर आदी गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबूताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई यांचा सर्वांत उंच ताबूत सकाळी सव्वाअकराला प्रथम उचलण्यात आला. त्यानंतर हा ताबूत वीज बोर्डाजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात साडेअकराच्यादरम्यान आणण्यात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. हे सर्व ताबूत ओळीने भेटीसाठी निघाले. त्यानंतर सातभाई पाटील, सातभाई बागवान, सातभाई आत्तार या उंच ताबूतांच्या भेटीचे प्रथम दर्शन दुपारी सव्वाबाराला झाले. हे सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेशबाबा पतसंस्थेजवळ आले. तेथे तांबोळी यांचा ताबूत मिळाला. दुपारी साडेबाराला सर्व ताबूत सुरेशबाबा देशमुख चौकात येऊन थांबले. तेथे इनामदार व सुतार यांचे उंच ताबूत आले. हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूदमाला ताबूत व पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे आणले गेले. दुपारी दीडला ताबूत उचलण्यात आले व मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला. प्रारंभी सातभाई पटेल, सातभाई इनामदार, सातभाई आत्तार आदी उंच ताबूतांच्या भेटीला सुरुवात झाली. यावेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, कऱ्हाडचे आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, डॉ. जितेश कदम, रविराज देशमुख, भाऊसाहेब यादव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, सरपंच राजू जाधव, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी आदी उपस्थित होते. मोहरमनिमित्त रविवारी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. जियारत कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वाजता होणार आहे. (वार्ताहर)