नैसर्गिक आपत्तीदरम्यान कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुका एक वर्षाच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्याचा राज्य शासनास अधिकार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना गतवर्षी १८ मार्चपासून स्थगिती देण्यात आली आहे. १७ मार्च २०२१ रोजी यास एक वर्ष होत असल्याने मंत्रिमंडळाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा दि. ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत, अशा सहकारी संस्था वगळून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशान्वये ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशा संस्थांच्या निवडणुका व राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. १६ जानेवारीपासून ज्या टप्प्यावर असतील, तेथे ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सहकार विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुन्हा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST