फोटो ओळ : नेलेॅ (ता. वाळवा) येथे इस्लामपूर अर्बन बँकेच्या नेलेॅ शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. सुरेश भोसले, आ. मानसिंगराव नाईक, बँकेचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.
नेलेॅ : सहकारी बँकांच्या समोर अनेक अडचणी आहेत. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे या बँकांची स्वायत्तता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सहकारी बँकांनी यापुढच्या काळात अधिक सेवाभावीवृत्तीने काम करावे लागेल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
नेलेॅ (ता. वाळवा) येथे इस्लामपूर अर्बन को-ऑप. बँकेच्या नेर्ले शाखेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व आ. मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पाटील म्हणाले की, विजयभाऊ पाटील यांनी ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली. त्यांच्यानंतर संचालक मंडळाचा अधिक वेगानेही बँक पुढे नेण्याचा निर्धार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज स्वमालकीच्या इमारतीत ही बँक स्थलांतर होत आहे.
बँकेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी स्वागत केले. संचालक शहाजी पाटील यांनी प्रस्ताविक केले. शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले.
या वेळी चिमण डांगे, प्रा. शामराव पाटील, जनार्दन पाटील, भगवानराव पाटील, संजय पाटील, संभाजी पाटील, सतीश पाटील, सुभाष पाटील, सरपंच छायाताई रोकडे, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम आदी उपस्थित होते.
चाैकट
आष्टा ते डिग्रज दरम्यान रुग्णालय
जयंत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता इस्लामपूर येथे शंभर बेडचे सुसज्ज रुग्णालयाबरोबर सांगली व आष्टा ते डिग्रज दरम्यान लवकरच रुग्णालय उभा करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सक्षमपणे आरोग्यसेवा यापुढच्या काळामध्ये उभी करण्याच्या प्रयत्न आहे.