शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेट कनेक्टिव्हिटीअभावी पोस्टाचे व्यवहार बंद

By admin | Updated: November 19, 2015 00:38 IST

कामेरीतील प्रकार : ग्राहकांमधून तीव्र नाराजी; केबल तुटल्याचे कारण

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गालगत दूरसंचार विभागाची ओएफसी केबल तुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून पोस्टाचे सर्व व्यवहार नेट कनेक्टिव्हिटीअभावी ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना काम करून घेण्यासाठी ताटकळावे लागत आहे. एवढे होऊनही दुरूस्तीकडे संबंधितांकडून कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. पोस्ट खात्याने नुकतेच कामेरीसह ग्रामीण भागातील बहुतांशी पोस्ट कार्यालयातील व्यवहार आॅनलाईन पध्दतीने सुरू केले आहेत. त्याची परिपूर्ण माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना नसल्याने त्यांचा गोंधळ उडत आहे. त्यातच नेट कनेक्टिव्हिटी मिळण्याची खात्री ग्रामीण भागामध्ये देता येत नसल्याने बहुतांशवेळा ही सेवा ठप्पच असते. दूरसंचार विभागाचे कर्मचारीही नेट कनेक्टिव्हिटीबाबतच्या तक्रारीची दखल गांभीर्याने घेत नाहीत, असा अनुभव आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडीनजीक ओएफसी केबल तुटली आहे. याबाबत पोस्ट अधिकाऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून पोस्टातील आरडी भरणा, आरडी मॅच्युरिटी, एमआयएस व सेव्हींग खात्यातील पैसे मिळणे यासह पोस्टातील गुंतवणुकीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तरी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोस्ट खात्याचा आॅनलाईन कारभार चालण्यासाठी तात्काळ तुटलेल्या केबलची दुरूस्ती करून नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) केबल तुटण्याचे प्रकार नेहमीचेच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडीनजीक ओएफसी केबल तुटली आहे. केबल तुटण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आता मात्र बँकींग बरोबर पोस्टातील व्यवहारही आॅनलाईन होत असल्याने याचा मोठा फटका ग्रामस्थांना बसत आहे. याबाबत पोस्ट अधिकाऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.