शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील तमाशा बंद करा

By admin | Updated: August 28, 2016 00:21 IST

पतंगरावांनी खडसावले : महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांची सांगलीत बैठक

सांगली : लोकांच्या हिताचे राजकारण झाले पाहिजे. भ्रष्टाचार, गटबाजी, वाद अशा गोष्टींचा महापालिकेतील तमाशा आता बंद करा, अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शनिवारी महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवकांना खडसावले. स्थायी समितीच्या तीन सदस्यांच्या निवडीसाठी आयोजित बैठक कोणत्याही निर्णयाविना पार पडली. कदम यांच्या निवासस्थानी सायंकाळी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडून महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. प्रभागनिहाय विकासकामांची स्थिती, शहरातील प्रश्न, अडचणी याबाबत चर्चा झाली. सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात थोडी कामे जास्त होत असली तरी, अन्य पक्षीय सदस्यांच्या प्रभागातही कामे झाली पाहिजेत. प्रश्न लोकांशी निगडीत असल्याने लोकहितासाठी कारभार असला पाहिजे. नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट करायचे, पक्ष म्हणून मदत करायची आणि सत्ता आल्यानंतर यांचा ठरलेला कारभार चालायचा. यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत लगेच खुलासा केला पाहिजे. मौन बाळगून राहू नये. लोकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. महापालिकेत फक्त कॉंग्रेसचाच गट आहे. अन्य गटबाजी चालणार नाही. ज्यांना आपले वेगळे अस्तित्व राखायचे आहे, असे लोक स्वतंत्र पाल उभी करतात. अशी पालं उभारणारे आजवर अनेक पाहिलेत. अशांचे काही साध्य होत नाही. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये तीन सदस्य कॉँग्रेसला निवडायचे आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची की अनेकदा निवडून येऊनही ज्यांना संधी मिळाली नाही, अशांना संधी द्यायची, याबाबत निर्णय झालेला नाही. चर्चा सुरू आहे. लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) सांगली झटक्यात बळकवताहेत... गेली कित्येक वर्षे मी सांगलीतील राजकारणात सक्रिय आहे. आम्हाला कधीच ज्या गोष्टी जमल्या नाहीत, त्या गोष्टी भाजपचे नेते झटक्यात करीत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा बळकाविण्याचे कसब त्यांनाच जमलेले आहे, अशी उपहासात्मक टीका कदम यांनी पृथ्वीराज देशमुख यांचे नाव न घेता केली. माझ्याविरुद्ध आजपर्यंत अनेकांनी कट केला आहे. अगदी मुंबईपासून कट सुरू असतो. तरीही मी माझ्या मतदारसंघात निवडून येतो. सांगलीतील जनता शहाणी आहे. त्यामुळेच अशा कटकारस्थानांचे माझ्यापुढे काही चालले नाही, असे मत कदम यांनी व्यक्त केले. विधानपरिषदेचा निर्णय कोअर कमिटी बैठकीत सांगली-सातारा विधानपरिषदेचे तिकीट राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसने घ्यावे आणि ते सांगलीसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी कॉंग्रेसमधून झालेली आहे. तरीही राज्यातील अन्य जागांचा ताळमेळ पाहून याबाबतचा निर्णय रविवार, दि. २८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले. मागील विधानसभा निवडणूक माझ्यासाठी शेवटचीच असल्याचे मी जाहीर केले होते, मात्र लोकांची इच्छा असली आणि त्यांनी आग्रह केला तर, पुन्हा मैदानात उतरू शकतो, असे कदम यांनी सांगितले.