शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिरवा-जिरवीचे राजकारण बंद करा

By admin | Updated: November 5, 2014 00:07 IST

पतंगराव कदम : ‘सोनहिरा’वरील आभार मेळाव्यात इशारा

वांगी : गेल्या २० वर्षांपासून मी राज्यात मंत्री म्हणून काम करीत असल्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत भाग घेत नव्हतो. मात्र आता स्थानिक पातळीवरील निवडणुकीत स्वत: लक्ष देऊन पक्षांतर्गत असणारे सर्व गट-तट मोडीत काढणार आहे. गटबाजीमुळे काही गावात मताधिक्य कमी पडले, त्याची गंभीर दखल घेतली जाईल. कोणाला पक्षातून बाहेर जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. मात्र, यापुढील काळात जिरवा-जिरवीचे राजकारण चालू देणार नाही, असा सज्जड दम आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. वांगी (कडेगाव) येथील सोनहिरा साखर कारखान्यासमोर आज आभार मेळव्यात आ. कदम बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, कडेगाव तालुका कॉँग्रेसच्या अध्यक्षा सौ. मालन मोहिते, सांगली युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, सांगली शहर कॉँग्रसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रतापशेठ साळुंखे, बाळासाहेब गुरव, महेंद्रआप्पा लाड, विटा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, जितेश कदम, भीमराव मोहिते उपस्थित होते.यावेळी आ. डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, पलूस-कडेगाव मतदारसंघातील जनतेने भाजपची लाट जुगारून मला निवडून देऊन, मी केलेल्या विकास कामांची पोहोचपावती दिली आहे. राज्यात सत्ता विरोधकांची असली तरी विकास कामात कुठेही कमी पडणार नाही. प्रत्येक गावा-गावात कॉँग्रेसचे दोन गट पडले आहेत व जिरवा-जिरवीचे राजकारण सुरू आहे. जिरवा-जिरवीमुळे काही गावात मताधिक्य घटले आहे. येथून पुढील काळात जिरवा-जिरवीचे धंदे चालू देणार नाही. जिल्ह्यातील कॉँगे्रसला बळकटी आणणार आहे. ज्यांना पक्षात थांबावयाचे नाही, त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे. या निवडणुकीत जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी माझ्याविरोधात काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. राज्यात सरकार बदलल्यामुळे काही मंडळी ताकद दाखविण्याची भाषा करीत आहेत. त्यांनाही आम्ही जशास तसे उत्तर देणार आहोत. प्रत्येक आठवड्याला तालुक्याच्या ठिकाणी येऊन जनतेचे प्रश्न सोडविणार आहे, असेही आ. डॉ. पतंगराव कदम यावेळी म्हणाले.डॉ. विश्वजित कदम, सौ. मालन मोहिते, अ‍ॅड. आत्माराम मदने, सत्यजित देशमुख, व्यंकटराव पवार, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, भीमराव मोहिते, रामचंद्र पाटणकर यांची भाषणे झाली. यावेळी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, वैभव गायकवाड, सभापती लता महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, आकांक्षा तांबेवाघ, शांताराम कदम, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, नाथाजी मोहिते, प्रकाश जाधव, संभाजी जगताप, बाजीराव पवार, युवराज कदम, अशोक महाडिक, सुनील जगदाळे, पी. सी. जाधव, बापूसाहेब पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)...तर जशास तसे उत्तर पतंगराव कदम पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इशारा देताना म्हणाले की, स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुकीत लक्ष घालणार असून पक्षाला बळकटी आणणार आहे. ज्यांना पक्षात थांबावयाचे नाही, त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे. या निवडणुकीत जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी माझ्याविरोधात काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देईन. सत्तापालटामुळे काही मंडळी ताकद दाखविण्याची भाषा करीत आहेत. त्यांनाही जशास तसे उत्तर देऊ.