शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्यावरील बैठका बंद करा!

By admin | Updated: May 31, 2017 00:14 IST

बंगल्यावरील बैठका बंद करा!

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापौर हारुण शिकलगार आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यातील सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. आयुक्तांच्या बंगल्यावर वारंवार होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बैठकांना चाप लावण्याचा निर्धार महापौरांनी केला आहे. बंगल्यावर बैठका घेऊ नयेत, अशी स्पष्ट सूचना महापौरांनी आयुक्तांना केली आहे. खेबुडकर यांनी पदभार घेतल्यापासून महापौर शिकलगार नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिले, पण आता दोघांत संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येते. आयुक्त खेबुडकर यांनी पदभार घेऊन वर्षभराचा कालावधी होत आहे. या कालावधीत त्यांच्या दिरंगाईच्या कारभाराबद्दल नगरसेवकांत नाराजी होती. अनेकदा महासभेच्या व्यासपीठावर नगरसेवकांनीही नाराजी उघडपणे बोलून दाखविली आहे. पण महापौरांनी आयुक्तांसमवेत बसून निर्णय घेऊ, असे म्हणत नगरसेवकांची बोळवण केली होती. पण आता खुद्द महापौरांनीच आयुक्तांविरुद्ध रणशिंग फुंकण्याचा निर्धार केल्याचे बोलले जात आहे. त्याची सुरुवात सोमवारी झाली. महापौरांनी आयुक्तांना पत्र पाठवून बंगल्यावरील बैठकांना आक्षेप घेतला आहे. सातत्याने अधिकारी आयुक्तांच्या बंगल्यावर जात असल्याने, महापालिकेची कार्यालये अनेकदा ओस पडलेली असतात. त्याचा संदर्भ देत महापौरांनी बंगल्यावरील बैठकांना विरोध केला आहे. महापौरांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर आयुक्तांसाठी भलेमोठे कार्यालय आहे. या कार्यालयात अधिकारी, पदाधिकारी, नागरिक व बाहेरगावाहून आलेल्या अतिथींच्या कामांचा निपटारा करण्यासाठी बैठका घेणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून अधिकाऱ्यांच्या बहुतांश बैठका शासकीय विश्रागृहामागील आयुक्तांच्या बंगल्यावरच होत आहेत. आमच्या कार्यालयात सामान्य नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी विविध कामे घेऊन येतात. तेव्हा या कामांचा निपटारा करण्यासाठी आपण व आपले अधिकारी कार्यालयात हजर असणे आवश्यक आहे. पण आपण बंगल्यावर बैठका घेत असल्याने या कामाबाबत समक्ष चर्चा करणे, अधिकाऱ्यांकडून कामे करून घेणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे नगरसेवक, पदाधिकारी, नागरिकांची कामे होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. तरी आपण बंगल्यावर कोणताही अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत कोणत्याही विषयावर बैठका घेऊ नयेत. महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त दालनामध्येच या बैठका व्हाव्यात. महापौरांनी अचानक आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.बांधकाम परवान्यासाठी ‘अल्टिमेटम’महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या बांधकाम परवान्याच्या १७० फायली आयुक्तांच्या मान्यतेसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. त्यावरही महापौर शिकलगार यांनी आयुक्तांना पत्राद्वारे धारेवर धरले आहे. बांधकाम परवाना, प्लॉट एकत्रिकरण, बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र आदींच्या फायली आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे महापालिकेला चार ते पाच कोटी रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित रहावे लागत आहे. वास्तविक बांधकाम परवान्यासाठी फाईल नगररचना विभागाकडे आल्यानंतर ३० दिवसांच्या आत मान्यता देणे बंधनकारक आहे. पण गेल्या सहा महिन्यांपासून परवान्याच्या फायली पडून आहेत. येत्या सात दिवसांत त्याची पूर्तता न झाल्यास हा विषय महासभेत घेऊन त्याचा अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असा दमही महापौरांनी भरला आहे. तसेच प्रशासनाच्या या कार्यपद्धतीमुळे शहरात बेकायदा बांधकामांची संख्या वाढत असल्याचे खापर त्यांनी आयुक्तांवर फोडले आहे.