शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात गॅस शवदाहिनी बंद

By admin | Updated: November 11, 2015 00:14 IST

नगरपालिकेचे दुर्लक्ष : उत्कृष्ट कामे दाखवा अन् बक्षीस मिळवा!

अशोक पाटील -- इस्लामपूर नगरपालिकेने कापूसखेड रस्त्यानजीक स्मशानभूमी तयार केली आहे. तेथेच ५८ लाख रुपये खर्चून गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे, पण काही महिन्यांच्या वापरानंतर ती बंद पडली आहे. दोन महिन्यांपासून नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. शहरातील इतर कामांचाही ‘फ्लॉप शो’ झाला आहे. ‘पालिकेने केलेली उत्कृष्ट कामे दाखवा अन् बक्षीस मिळवा’ अशी उपरोधिक स्पर्धा ठेवण्याची वेळ आल्याचे विरोधी नगरसेवक व काही सामाजिक संघटनांनी सांगितले.इस्लामपूरची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पालिकेने विविध समाजांसाठी वेगवेगळ्या स्मशानभूमी बांधल्या आहेत. कापूसखेड रस्त्यानजीक अत्याधुनिक स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे. येथे हिरवीगार झाडी आहे. तेथेच गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे. त्यासाठी शासनाचे ३८ लाख व नगरपालिकेचे २0 लाख असे ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी तेथे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना स्फोट झाला होता. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकारावर पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पडदा टाकून, प्रकरण बाहेर येणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र तेव्हापासून शवदाहिनी बंद आहे. दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही पालिकेने दुरुस्तीबाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.विकासकामे झाली : पण दर्जाबाबत शंकाइस्लामपूर शहरात घरकुल योजना, रस्ते, गटारी, पोहण्याचा तलाव, चौक सुशोभिकरण, एल. ई. डी. पथदिवे, गांडूळ खत प्रकल्प, वृक्षारोपण अशी अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. परंतु यातील किती कामे दर्जेदार आहेत, हा संशोधनाचा विषय असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.