शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

निर्मलसाठी जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींचा खोडा

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

शौचालयांचा अभाव : जिल्हा परिषदेसमोर अभियान पूर्ण करण्याचे आव्हान

रत्नागिरी : जिल्हा निर्मल होण्यासाठी ८८ ग्रामपंचायतींचा खोडा असून, जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याचे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही शौचालये २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे.उघड्यावर शौचाला बसणे म्हणजे रोगराईला निमंत्रण देण्याचाच एक भाग आहे. रत्नागिरी जिल्हा निर्मल करतानाच प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने फार पुढे आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्येही स्वच्छतेला महत्व दिले जाते. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान, तर एमआरजीएसमधून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.जिल्ह्यातील किती कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, याबाबतचा निर्मल भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याने ही कुटुंबीय सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात, असे पुढे आले होते. जिल्ह्यातील लांजा आणि गुहागर हे तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाल्याने हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. पालघर ग्रामपंचायत या एकमेव ग्रामपंचायतीमुळे गुहागर पंचायत समिती निर्मल होण्यास अडचण निर्माण झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत निर्मलग्राम होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सरपंच, सदस्य यांच्या खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यातून त्यांचे प्रबोधनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरामध्ये शौचालय असल्यास जिल्हा निर्मल होईल. त्यासाठी जनतेनेही पुढे येणे अवश्यक आहे. (शहर वार्ताहर)तालुक्यातील निर्मल ग्रामन झालेल्या ग्रामपंचायतीतालुका ग्रामपंचायतीदापोली१६ खेड१८ चिपळण२८ रत्नागिरी८ संगमेश्वर९ राजापूर८ मंडणगड१८८ ग्रामपंचायती निर्मल करताना दमछाककेवळ दोनच तालुके निर्मलनिर्मल नसलेल्या ग्रामपंचायतींचा आकडा पुढे सरकेनासाडेतीन हजार कुटुंबीय वैयक्तिक शौचालयाविनाजनतेकडून सहकार्याची अपेक्षास्वच्छतेसाठी प्रबोधनाची आवश्यकता निर्मलग्रामची संकल्पना अधिक ताकदवान व्हावी