शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाचे ‘लॉबिंग’ सुरू

By admin | Updated: December 7, 2015 00:25 IST

तासगावात मोर्चेबांधणी : खासदारांच्या निर्णयाची उत्सुकता

दत्ता पाटील -तासगाव नगरपालिकेत दोन महिन्यांपूर्वी भाजपची सत्ता आली. पहिल्या दोन महिन्यांसाठी ठरल्यानुसार सुशिला साळुंखेंना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आता नव्याने नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता आहे. यासाठी इच्छुक नगरसेवकांकडून लॉबिंंग केले जात असल्याचे चित्र आहे.तासगाव नगरपालिकेची साडेतीन वर्षापूर्वी निवडणूक झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या घडामोडींनी राजकीय नाट्य सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी या नाट्याचा तिसरा अंक सुरु झाला. काँग्रेसचा टेकू घेऊन पालिकेवर वर्चस्व ठेवण्याचा आबा गटाचा डाव भाजपचे खासदार संजयकाकांनी मोडीत काढला. आबा गटाच्या काही शिलेदारांना भाजपमध्ये प्रवेश देत, तर काहींची सोबत घेत पालिकेत सत्तांतर घडवून आणले. दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुशिला साळुंखे यांना दोन महिन्यांसाठी नगराध्यक्षपद दिले. ठरलेल्या कमिटमेंटनुसार साळुंखेंनी आठ दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र नवा नगराध्यक्ष कोण? हे निश्तिच झाले नसल्याने तासगावकरांची उत्सुकता ताणली गेली आहे.आबा गटाचा हात सोडून काका गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची इच्छा आहे. अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांनाही नगराध्यक्षपद हवे आहे. तर मुळे काका गटातून निवडून आलेल्या नगरसेवकांनाही नगराध्यक्षपदाची संधी आपल्यालाच हवी, अशी इच्छा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीचा गुंता वाढला आहे. नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांतूनही लॉबिंग सुरु केले असल्याची दिसून येत आहे. नगरसेवक कोणासाठी वजन वापरणार, याची चाचपणी होत आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या भूमिकेवरच नव्या नगराध्यक्षांची निवड होणार, हे निश्चित आहे. सत्ता गटात धुसफूस : पुन्हा ये रे माझ्या मागल्या... तासगाव पालिकेत सत्तेत आल्यापासून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी सामन्यासारखे कमी कालावधीसाठी निवड करावी लागली होती. तरीही काही नगरसेवकांनी नाराजी ओढावून घ्यावी लागली. त्यामुळे काही नगरसेवकांनी काका गटाचा रस्ता धरला. दोन महिन्यांपूर्वीदेखील अशाच नाराजीतून काही नगरसेवकांनी आबा गटाचा हात सोडला होता. आता काका गटातही नगराध्यक्षपदाची धुसफूस सुरू असून, नगराध्यक्षपदासाठी पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच चित्र दिसून येत आहे.दोन सदस्यांची तयारी नगराध्यक्षपदासाठी काका गटातून नगरसेवक बाबासाहेब पाटील आणि अविनाश पाटील या दोघांतच सद्यस्थितीत जोरदार रस्सीखेच होताना दिसून येत आहे. यावेळी संधी आपणालाच मिळावी, यासाठी दोन्ही नगरसेवकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.