शहर काँग्रेसच्यावतीने नूतन पदाधिकाऱ्यांना नाना पटोले यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी आ. विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, नामदेवराव मोहिते, उमेश पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली शहर काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी रविवारी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आशा पाटील यांची, तर चिटणीसपदी क्रांती कदम यांची निवड करण्यात आली. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते निवडीची पत्रे देण्यात आली.
यावेळी आ. विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, उपमहापौर उमेश पाटील, नामदेवराव मोहिते आदी उपस्थित होते.
सांगली जिल्हा किसान काँग्रेस सेलच्या जिल्हाध्यक्षपदी महावीर पाटील, सांगली शहर अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ पेंढारी, सांगली शहर जिल्हा मागासवर्गीय विभाग अध्यक्षपदी सिद्धार्थ कुदळे, तर सांगली शहर जिल्हा सोशल मीडिया मागासवर्गीय विभागाच्या अध्यक्षपदी स्वप्निल एरंडोलीकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पटोले म्हणाले की, नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी ताकदीने काम करावे. काँग्रेसकडे हा गड पुन्हा येण्यासाठी संघटन वाढवावे. राज्य शासनाच्यावतीने लोकांच्या हिताच्या योजना राबविण्यात येताहेत. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यांना आम्ही ताकद देऊ.