शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरी बस भर रस्त्यातच पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन राज्य शासन करीत असताना, शहरी बस मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन राज्य शासन करीत असताना, शहरी बस मात्र प्रवाशांची डोकेदुखी ठरू लागली आहे. त्याचा अनुभव शुक्रवारी प्रवाशांना आला. सांगली बसस्थानकातून यशवंतनगरकडे जाणारी बस काँग्रेस भवनजवळील चौकात अचानक बंद पडली. ही बस सुरू होणार नाही, असे वाहक, चालकांकडून सांगण्यात आले. प्रवाशांना दुसऱ्या बसचा पर्यायही लवकर उपलब्ध करून दिला नाही. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू होता.

सांगली बसस्थानकातून सकाळी सव्वादहा वाजता यशवंतनगरला जाणारी बस आहे. बसस्थानकातून ही बस पावणेअकराच्या सुमारास सुटली. या बसमध्ये महिला, विद्यार्थीही होते. आधीच अर्धा तास बस उशिरा सुटल्याने प्रवासी वैतागले होते. मजल-दरमजल करीत ही बस काँग्रेस भवनजवळील बसथांब्यावर आली. तेथून थोड्या अंतरावर जाताच ती बंद पडली. चालकाने बऱ्यापैकी प्रयत्न केले. पण बस सुरू होत नसल्याचे पाहून त्याने नियंत्रण कक्षाला कळविले. दरम्यान, प्रवाशांनी दुसरी बस मागविण्याची विनंतीही केली. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काही प्रवाशांनी नियंत्रण कक्षालाही दूरध्वनी केला. पण दूरध्वनीच उचलला गेला नाही. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू होता. काही प्रवाशांनी शहरी बसचा नाद सोडून वडापने मार्गक्रमण केले. महिला प्रवाशांनी वाहक, चालकांकडे संताप व्यक्त केला. अखेर तासभरानंतर दुसरी बस पाठविण्यात आली. महामंडळाच्या या कारभाराबद्दल प्र‌वाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.

कोट

बसस्थानकातूनच आधी उशिरा बस सोडली गेली. त्यानंतर काँग्रेस भ‌वनजवळ ती बंद पडली. आम्ही नियंत्रण कक्षाशी संपर्क केला. पण कुणीच दूरध्वनी उचलला नाही. जवळपास तासभर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

- सीमा पाटील, प्रवासी