शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

कुपवाडमध्ये पालिका सहायक आयुक्तांना घेराओ

By admin | Updated: November 25, 2014 23:49 IST

काँग्रेसचे आंदोलन : समस्यांचा निपटारा न झाल्यास हंटरफोड आंदोलन

कुपवाड : शहरातील स्वामी मळा, शिवनेरीनगर, खारे मळ्यासह इतर उपनगरांतील नागरी समस्यांप्रकरणी आज (मंगळवारी) शहर काँग्रेसच्यावतीने प्रभाग समिती तीनचे सहायक आयुक्त चंद्रकांत चौधरी यांना घेराओ घालण्यात आला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेबद्दल जाब विचारण्यात आला. येत्या आठ दिवसांत या समस्यांचा निपटारा न झाल्यास हंटरफोड आंदोलन करण्याचा इशाराही त्यांच्यावतीने देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या विरोधातील हे आंदोलन नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक तीनच्या प्रशासनाकडून शहरासह उपनगरात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सिध्दार्थनगरमध्ये कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. गटारीची स्वच्छताही केली जात नाही. खारे मळ्यामध्ये गटारीचे काम निकृष्ट झाले आहे. शिवनेरीनगरमध्येही स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. मेन रोडवर मटण विक्रेत्यांकडूनही बेकायदा बोकडांची कत्तल केली आहे. त्याचे पाणी धार्मिक स्थळाकडे जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमधून संतापाची लाट पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नगरसेवक मगदूम यांनी नागरिकांसमवेत जाऊन प्रभाग तीनच्या अधिकाऱ्यांना विविध समस्यांप्रकरणी जाब विचारला. शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासह मुख्य रस्त्याच्या पॅचवर्कचे काम त्वरित सुरू करण्याची मागणीही यावेळी नागरिकांच्यावतीने करण्यात आली. येत्या मंगळवारपर्यंत या समस्यांचा निपटारा न केल्यास हंटरफोड आंदोलन करण्यासह महापालिका कार्यालयात कचरा टाकून अधिकाऱ्यांना गटारीच्या पाण्याने अंघोळ घालण्याचा इशाराही नगरसेवक मगदूम यांनी दिला आहे. यावेळी अरुण रूपनर, बापूसाहेब तोडकर, सचिन पाटील, महेश निर्मळे, हणमंत सरगर, राहुल कोल्हापुरे, सनी धोतरे, आनंदा बनसोडे, प्रकाश सूर्यवंशी, कुमार बामणे, राणगे, विनायक गवळी, सुरेश ढोणे, सलीम काझी, अजित सरोदे, समीर मुजावर, संदीप कारंडे, अभिजित परीट, अज्जू पटेल आदी उपस्थित होते. (वार्ताहर)ठेकेदारांमुळे नुकसानकुपवाड शहरासह उपनगरांमधून राजकीयसह इतर ठेकेदारांकडून महापालिकेची विविध विकास कामे घेतली जातात. परंतु डांबरी रस्त्यासह गटार, पॅचवर्कची ही कामे संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची केली जातात. त्यामुळे कुपवाडचे नुकसान होत आहे. यापुढील कालावधित शहरात सुरू होणारी डांबरीकरणासह विविध कामे उत्कृष्ट व चांगल्या दर्जाची करण्यावर भर देणार आहे.