शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बालसवंगड्यांचा अभ्यास दौरा आणि स्वच्छता

By admin | Updated: December 12, 2014 23:32 IST

कारखान्याला भेट : आरगच्या चार वस्तीशाळांचा संयुक्तिक उपक्रम

लिंगनूर : आरग परिसरातील चार वस्तीशाळांच्या मुलांनी परिसर भेटीअंतर्गत आरग येथील रेल्वे स्टेशन व मोहनराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन अभ्यास दौरा केला. कारखान्यातील ऊस उतरून घेण्यापासून ते प्रक्रिया करून साखरनिर्मिती व नंतर गोदामापर्यंत साखर साठवणुकीच्या टप्प्यापर्यंत विद्यार्थ्यांना उसापासून साखर कशी तयार होते, या विषयावर प्रात्यक्षिकासह अभ्यासदौरा पूर्ण केला. आरग येथील रेल्वे स्टेशनची स्वच्छताही स्वच्छ अभियान मोहिमेंतर्गत केली.याच दौऱ्यात कार्यानुभव विषयांतर्गत स्वच्छता उपक्रम म्हणून व स्वच्छ भारत मोहिमेचा एक भाग म्हणून आरगच्या रेल्वे स्थानक व स्थानक परिसराची स्वच्छता करीत प्रवासी प्रतीक्षा कक्ष स्वच्छ केला. लहानांच्या या स्वच्छ भारतच्या उपक्रमात आरग रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर शर्माही सहभागी झाले होते. किमान वर्षातून दोन परिसर भेटी घेतल्या जाव्यात, या नियोजनानुसार यावर्षी आरग परिरातील गायकवाड चव्हाण मळा, रामनगर अ, रामनगर ब, आरग स्टेशन या चार जिल्हा परिषदांच्या वस्ती शाळांनी या परिसर भेटीचे नियोजन केले होते. त्यानुसार या चार शाळांतील ८० विद्यार्थी या भेटीत व अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. याच भेटीत कारखाना परिसरात ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांमध्येही गृहभेटी घेऊन त्या मजुरांची जीवनशैली व दैनंदिन काम यांचीही माहिती शिक्षकांनी मुलांना यावेळी करून दिली. या अभ्यास दौऱ्याचे व परिसर भेटीचे संयोजन या शाळांचे शिक्षक अमोल शिंदे, पांडुरंग नाईक, आकाश जाधव, अमोल भोई, विजय कदम, पोपट निकम, दिलीप पाटील यांनी केले. (वार्ताहर)