शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

By admin | Updated: July 5, 2017 23:33 IST

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखला. जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या सौरकंदील व भात मळणी यंत्रांच्या खरेदीत एक कोटीच्या घोटाळ्याची व टाकळी येथील बंधाऱ्याच्या नित्कृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी सदस्यांनी बुधवारी सभेत केली. पंचायत समितीची मासिक सभा सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती काकासाहेब धामणे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधारी गटाचे सदस्य राहुल सकळे यांनी मांडला. यास काँग्रेसचे अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण, अनिल आमटवणे, रंगराव जाधव, कृष्णदेव कांबळे यांनी जोरदार विरोध केला. जाचक अटींमुळे कर्जमाफीस बहुसंख्य शेतकरी अपात्र असल्याचे कृष्णदेव कांबळे यांनी निदर्शनास आणले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या कर्जमाफीऐवजी, निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी दिल्यानंतर अभिनंदनाचा ठराव घ्या, असे सांगत हा ठराव राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखून धरला. उपसभापती धामणे यांनी ठरावाचा आग्रह धरला. मात्र विरोधी सदस्यांच्या विरोधामुळे तो बारगळला. बहुमत असतानाही भाजप सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केलेल्या एलईडी सौरकंदील व भात मळणी यंत्र खरेदी घोटाळ्याची अशोक मोहिते यांनी तक्रार केली. खरेदीची रक्कम व साहित्य दोन्हीही ठेकेदाराकडे असल्याने, यातही घोटाळा असल्याने संबंधितांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी मोहिते यांनी केली.टाकळीतील बंधारा निकृष्ट मुख्यमंत्र्यांच्या जलशिवार योजनेअंतर्गत टाकळी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यासाठी मातीमिश्रित वाळू व मातीचा वापर करण्यात आला असल्याने सिमेंट बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ग्रामस्थांनी विरोध करूनही ते पूर्ण करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल आमटवणे यांनी केली. विविध विषयांच्या चर्चेत विक्रम पाटील, छाया हत्तीकर, दिलीपकुमार पाटील, शुभांगी सावंत यांनी सहभाग घेतला.हिंदू-मुस्लिम निरपराधांवरील खटलेही मागे घ्यामिरज दंगलप्रकरणी फक्त भाजपचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांवरील गुन्हेच मागे घेण्यात आले आहेत. दंगलीत अडकलेल्या सर्व हिंदू-मुस्लिम निरपराध तरूणांवरील गुन्हेही शासनाने मागे घेण्याची मागणी काँग्रेसचे अनिल आमटवणे यांनी केली. दोन्ही गटाच्या तरूणांवरील खटले मागे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास आ. सुरेश खाडे यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असेही आमटवणे यांनी सांगितले.