शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचे चालक माणिकदादांच्या कार्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

एसटीचे चालक ही आपली नोकरी न समजता समाजाचे व्रत मानून माणिक यादव यांनी ३६ वर्षे प्रवाशांची अविरत सेवा केली. ...

एसटीचे चालक ही आपली नोकरी न समजता समाजाचे व्रत मानून माणिक यादव यांनी ३६ वर्षे प्रवाशांची अविरत सेवा केली. या प्रदीर्घ सेवेनंतर माणिकदादा सोमवारी सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवेतील शेवटच्या दिवशी निरोप घेताना त्यांनी आपल्या लाडक्या लालपरीला घट्ट मिठी मारली, तसेच एसटीतील गणपतीबाप्पाच्या प्रतिमेसमोर हात जोडून नतमस्तक होताना माणिकदादांना गहिवरून आले. माणिकदादांच्या एसटीच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल ‘लोकमत’ने ‘लाल परीला अखेरचा दंडवत आणि माणिकदादांच्या डोळ्यांत आले अश्रू’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. ‘लोकमत’मधील ही बातमी वाचूनच मुख्यमंत्री ठाकरे यांनीही बुधवारी दुपारी ४ वाजता दूरध्वनी करून आपली एसटीशी नाळ घट्टपणे जोडल्याबद्दल कौतुक केले, तसेच सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस त्यांनी माणिकदादांना शुभेच्छाही दिल्या. एसटीवरील प्रेमाची व निष्ठेची दखल परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी घेतली. त्यांनी यादवदादांना फोन करून शुभेच्छा दिल्या. आपण गेली अनेक वर्षे मनापासून जी सेवा केलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक करतो. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष व निष्ठावान कर्मचाऱ्यांच्या प्रेमामुळे एसटीची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

चौकट

एसटीच्या कुटुंबाचा तुम्ही एक घटक

ॲड. अनिल परब यांनी दूरध्वनीवरून माणिकदादांशी संपर्क करून तुम्ही कागदोपत्री सेवानिवृत्त झाले आहात; पण प्रत्यक्ष तुम्ही एसटीच्या कुटुंबातील एक घटक असल्यामुळे नेहमी एसटीबरोबरच असणार आहात. तुम्हाला कधीही अडचण भासल्यास आमच्याशी संपर्क करा, तुमच्याबरोबर आम्ही आहोत, अशी कौतुकाची थाप परिवहनमंत्र्यांनी माणिकदादांना दिली.