शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 घोटाळ्यातील पैशातूनच विखेंचे तोंड मुख्यमंत्र्यांनी बंद केले का? : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:15 IST

दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच

ठळक मुद्देआणखी दहा हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार

सांगली : दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच पैशातून त्यांनी विखेंचे तोंड बंद केले आहे का, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले की, मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत फडणवीस सरकारने बिल्डरांना एक लाख कोटीचा फायदा करून देताना दहा हजार कोटीचा सौदा केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. दहा हजार कोटींपैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री कार्यालयास मिळाल्याचेही विखे-पाटील यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना हा आरोप जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही काळातच त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे विखे-पाटील यांचे तोंड याच पाच हजार कोटी रुपयांमधून बंद केले का, अशी शंका उपस्थित होत आहे.

कोल्हापूर येथील सभेत फडणवीस यांनी माझ्यावर, चोरांच्या कळपात गेल्याचा आरोप केला होता. मी कोणाच्या कळपात गेलो आहे हे जनतेला माहीत आहे. मात्र मुख्यमंत्री असूनही ते दरोडेखोरांच्या कळपात गेलेत, हे केव्हाच लोकांनी ओळखले आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सरकारवर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या टोळीबद्दल चिंतन करावे आणि त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देताना या सरकारचे बिंगही फोडू, असा इशाराही त्यांनी दिला.बांधकाम कामगार मंडळाशी संबंधित दहा हजार कोटी रुपयांचा एक घोटाळा समोर येत आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्याबाबतचा पंचनामा मी करणार आहे, असे ते म्हणाले....तर काँग्रेसविरोधातही शड्डूभाजपबरोबर गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केल्यानंतर मी सरकारमधून बाहेर पडलो. काँग्रेस पक्षाबरोबर आता आघाडी केली असली तरी, भविष्यात त्यांनीही शेतकऱ्यांविरोधात एखादी गोष्ट केली, तर त्यांच्याविरोधातही आम्ही शड्डू ठोकू. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बांधील आहोत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.चौकीदाराला चोर म्हणणारे सध्या भाजपसोबतचौकीदार चोर आहे, असे उघडपणे सांगत फिरणारे शिवसेनेचे नेते आता त्यांच्या चौकीदाराचे गोडवे गाताना दिसत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात आमची लढाई भाजप व शिवसेनेसोबत राहील. लोकशाहीसाठी धोकादायक असे हे सरकार आहे. त्यामुळे त्यांना वेळीच देशातून आणि राज्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही शेट्टी म्हणाले.‘स्वाभिमानी’चा उद्या प्रचार प्रारंभस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार प्रारंभ येत्या २७ मार्चरोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या जन्मभूमीत दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यानंतर आम्ही राज्यभर प्रचारसभा घेणार आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक