शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’बाबत मुख्यमंत्र्यांना विसर

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

सुमनताई पाटील : बेमुदत उपोषण करण्याचा इशारा; आठवड्याची मुदत

कवठेमहांकाळ : नागपूर अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोर दिलेल्या आश्वासनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेली म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत शासन चालढकल करीत आहे. सात दिवसात म्हैसाळ योजना सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आ. सुमनताईनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाणी योजनांची थकबाकी सात-बारावर बोजा म्हणून न चढविता ती माफ व्हावी, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन टंचाई निधीतून वीज बिलांची तरतूद करावी, म्हैसाळ योजना तात्काळ सुरू करण्याची आमची मागणी आहे. यासाठी मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी आमदार गणपतराव देशमुख, आ. जयंतराव पाटील, आ. विद्या चव्हाण, आ. दीपिका चव्हाण, आ. ज्योती कलाणी, आ. कपिल पाटील यांच्यासह विधानभवनच्या पायरीवर उपोषणाला बसलो होतो.हे उपोषण मागे घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तात्काळ उपोषणस्थळी पाठवले होते. त्यानुसार बुधवारी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल तथा मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, अजितदादा पवार, पतंगराव कदम, आ. गणपतराव देशमुख, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता उपासे, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता हेमंत उनाले यांच्यासह पाटबंधारे, ऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी योजना चालू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनीही वीज बिलात सूट देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर अजितदादा पवार, जयंतराव पाटील यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक झाली. अधिवेशन झाल्यानंतर आठ दिवसांत बैठक घेऊन योजना चालू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. पण त्यांना आश्वासनाचा विसर पडला. अधिवेशन होऊन दहा दिवस झाले तरी योजना सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पण या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. (वार्ताहर)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही माझी जबाबदारी आहे. ती झटकणार नाही. योग्य ती कार्यवाही करून सात दिवसांत योजना चालू करावी अशी मागणी गुरुवारी परत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. ती पूर्ण झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सुमनतार्इंनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.