शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

वर्षभर कोरोनाचेच रुग्ण तपासले, इतर रुग्ण पाहायचे तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST

सांगली : कोरोनाचा फटका अवघ्या जगाला बसला आहे, तसाच त्रास निवासी डॉक्टरांनाही सोसावा लागत आहे. त्याचे स्वरूप मात्र काहीसे ...

सांगली : कोरोनाचा फटका अवघ्या जगाला बसला आहे, तसाच त्रास निवासी डॉक्टरांनाही सोसावा लागत आहे. त्याचे स्वरूप मात्र काहीसे वेगळे आहे. निवासी डॉक्टर म्हणून काम करताना त्यांना हरतऱ्हेच्या रुग्णांचा अभ्यास करायला मिळतो; पण सध्या कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयांत कोरोना रुग्णांचीच भरती सुरू झाल्याने इतर रुग्णांचा सराव करायचा कधी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करणाऱ्या आणि एमएस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या वर्षभरापासून फक्त कोरोनाचेच रुग्ण तपासावे लागत आहेत. एमडीचा शिक्षणक्रम पूर्ण करताना वेगवेगळ्या आजारांचे जास्तीत-जास्त रुग्ण पाहण्याने ते अनुभ‌व समृद्ध होतात; पण सध्या कोरोनाचेच रुग्ण पाहण्याने अनुभवांवर मर्यादा येत आहेत. मिरजेचे रुग्णालय पूर्णपणे कोविड घोषित करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांना काही दिवस मिरजेत आणि काही दिवस सांगलीत ड्युटी करावी लागते. सांगलीला अन्य रुग्ण पाहता येतात, पण जेमतेम तीन किंवा चार रुग्ण वाट्याला येतात, असा अनुभव निवासी डॉक्टरांनी सांगितला.

विविध आजार व विकारांच्या रुग्णांसाठी मिरज शासकीय रुग्णालय प्रसिद्ध आहे. पाच-सहा जिल्ह्यांतून तसेच कर्नाटकातूनही रुग्ण येत असल्याने तऱ्हेतऱ्हेचे रुग्ण डॉक्टरांना पाहायला मिळतात. पण सध्या फक्त कोरोना रुग्णांमुळे अन्य आजारांच्या अभ्यासावर मर्यादा येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही डॉक्टर्स अंतिम वर्षाला आहेत. बाहेर पडल्यानंतर विविध आजारांच्या रुग्णांसा कसे सामोरे जायचे, याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. यासंदर्भात मार्डने संबंधित जिल्हाधिकारी, वैद्यकीय शिक्षण सचिव, आरोग्य मंत्र्यांपर्यंत धाव घेतली आहे. योग्य निर्णय झाला नाही, तर प्रसंगी राज्यस्तरीय सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोट

सध्या मिरज व सांगली रुग्णालयात रोटेशन पद्धतीने आम्हाला रुग्ण पाहता येतात; पण एका डॉक्टरला जेमतेम तीन-चारच रुग्णच मिळतात. यामुळे आमच्या अनुभवसंपन्नतेवर मर्यादा येत आहेत. फक्त कोरोनाचेच रुग्ण तपासत राहिलो, तर अन्य रुग्णांचा अनुभव‌ मिळणारच नाही.

- डॉ. प्रसन्न नेने, निवासी डॉक्टर, मिरज-सांगली शासकीय रुग्णालय

कोट

मिरज रुग्णालय पूर्णपणेे कोविडसाठी राखीव ठेवू नये. काही विभाग कोरोनाग्रस्तांसाठी, तर उर्वरित अन्य आजारांच्या रुग्णांसाठी खुले ठेवावेत. यातून रुग्णांची गैरसोय दूर होईल, शिवाय आम्हालाही वेगवेगळ्या विकारांचे रुग्ण पाहता येतील.

- डॉ. अमित अंबाडे, निवासी डॉक्टर, मिरज-सांगली शासकीय रुग्णालय

गेले वर्षभर फक्त कोरोनाचेच रुग्ण तपासत आहोत. सांगलीत अन्य विकारांचे मोजकेच रुग्ण पाहायला मिळतात. गेले वर्षभर कोरोनाची साथ असतानाही शासनाने अन्य डॉक्टरांची व्यवस्था केली नाही. आम्ही ज्या विषयात स्पेशलायझेशन करत आहोत, त्याचे रुग्ण येत नाहीत. त्यामुळे अनुभ‌व मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

- डॉ. प्रणाली पवार, निवासी डॉक्टर, मिरज-सांगली शासकीय रुग्णालय

कोट

मिरज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साठ जागा रिक्त आहेत. त्या भरल्या, तर आमच्यावरील ताण हलका होईल. आम्हाला कोरोनाशिवाय अन्य रुग्णांकडे लक्ष देता येईल. कोरोनामुळे आमचे सलग दुसरे वर्ष वाया चालले आहे. भविष्यात दुर्दैवाने पुन्हा रुग्ण वाढले, तर त्यांच्यावरच उपचार करावे लागतील, पुरेशा अनुभवाविना आम्हाला बाहेेर पडावे लागेल. त्यामुळे रुग्णालयात कोरोना व अन्य रुग्णांसाठी वेगवेगळे विभाग करून आम्हाला रुग्ण उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

- डॉ. नागेश माने, अध्यक्ष, मार्ड, सांगली-मिरज

पॉईंटर्स

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स - २४०

कोविड वॉर्डात ड्युटी असलेले डॉक्टर्स - २४०

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी - १०००