शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

पालिका क्षेत्रातील २४ कोटींच्या रस्त्यांची गुणवत्ता त्वरित तपासा : शेखर माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:20 IST

मिरज : महापालिकाक्षेत्रातील रस्ते कामात गैरव्यवहार झाला असून, सुमारे २४ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या ३५ रस्त्यांची कºहाड अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत गुणवत्ता व दर्जा तपासणी होणार आहे. एका सत्ताधारी आमदाराचा स्वीयसहायक महापालिका क्षेत्रातील रस्ते कामाचा ठेकेदार असून, रस्ते कामातील गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी न्यायालयाकडे कोर्ट कमिशन नियुक्तीची मागणी करणार असल्याचे नगरसेवक शेखर ...

ठळक मुद्दे आयुक्तांचे आदेश : गैरव्यवहाराविरोधात न्यायालयात जाणार

मिरज : महापालिकाक्षेत्रातील रस्ते कामात गैरव्यवहार झाला असून, सुमारे २४ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या ३५ रस्त्यांची कºहाड अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत गुणवत्ता व दर्जा तपासणी होणार आहे. एका सत्ताधारी आमदाराचा स्वीयसहायक महापालिका क्षेत्रातील रस्ते कामाचा ठेकेदार असून, रस्ते कामातील गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी न्यायालयाकडे कोर्ट कमिशन नियुक्तीची मागणी करणार असल्याचे नगरसेवक शेखर माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते अत्यंत खराब झाल्याने नगरसेवकांच्या पाठपुराव्याने सुमारे २४ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना सुरुवात झाली. त्यातील काही रस्ते पूर्ण झाले असून, मिरज शहरातील सुमारे ३ कोटी ३९ लाख ४० हजार सातशे, सांगलीतील १५ कोटी ८ लाख ६६ हजार सहाशे, कुपवाडमधील ४ कोटी १६ लाख ३ हजार नऊशे रुपये खर्चाच्या रस्ते कामाचा समावेश आहे. रस्ते कामाच्या दर्जाबाबत सांगली-मिरज-कुपवाड शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यासाठी आयुक्तांना मिरज येथील वंटमुरे कॉर्नर ते डॉ. आंबेडकर पुतळा ते हिरा हॉटेल या रस्त्याची तपासणी केली असता, हा रस्ता व मिरज शहरातील इतर रस्ते दर्जाहीन व कमी जाडीचे केले असल्याने या रस्त्यांच्या दर्जाची तपासणीची मागणी केली होती. ठेकेदार, अधिकारी व नागरिकांसमवेत रस्ता दर्जा तपासणी केल्यानंतर रस्त्याची जाडी व वापरलेले साहित्य निकृष्ट असल्याचे आढळले आहे.

याबाबत आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे सर्वच रस्ते कºहाड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी करावी, अशी मागणी केली होती. या मागणीप्रमाणे आयुक्तांनी रस्ते दर्जा तपासणीसाठी कºहाड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सुमारे २४ कोटी रुपयांच्या ३५ रस्त्यांचे आॅडिट व दर्जा तपासणी होणार आहे. शासन निधीतून ३३ कोटी रुपये खर्चाचे रस्त्याचे काम पूर्ण होताच त्याही रस्त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. रस्ते ठेकेदारांकडे कोअर कटिंग यंत्र बंधनकारक होते. मात्र, कोअर कटिंग यंत्र नाही. रस्त्याकरिता खडी व डांबराचे प्रमाण कमी असल्याने रस्ता दर्जाहीन होत, असल्याचा आरोप माने यांनी केला. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, नगरसेविका अश्विनी कांबळे, शिवसेना शहरप्रमुख विशालसिंग रजपूत, उपशहर प्रमुख दीपक पाटील, प्रदीप कांबळे, ऋषिकेश पाटील उपस्थित होते.आमदाराचा स्वीय सहाय्यक ठेकेदारएका सत्ताधारी आमदाराचा स्वीयसहायक महापालिका क्षेत्रातील रस्ते कामाचा ठेकेदार असल्याचा आरोप शेखर माने यांनी केला. रस्ते ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने बोगसगिरी सुरू असून, रस्ते ठेकेदार ‘लॉबी’ बळकट आहे. त्यांचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत आहे. तिन्ही शहरातील एकूण ३५ रस्त्यांपैकी सांगली- २१, मिरज- ८ आणि कुपवाड ६ अशा रस्त्यांची तपासणी होणार आहे. गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी न्यायालयाकडे कोर्ट कमिशन नियुक्तीचीही मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.